Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आलेले आहेत. महिलांना एकूण दोन महिन्याचे 3000 हजार रुपये मिळत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर बऱ्याच महिलांना आणखी हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळालेला नाही. यामागील कोणती महत्त्वाची मुख्य कारणं असतील ?
Ladki Bahin Yojana Installment
आतापर्यंत शासनाकडून जवळपास 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. संबंधित योजनेसाठी कोट्यावधी अर्ज करण्यात आलेले असून यामधील बरेच अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. काही महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही, याची कोणती मुख्य कारणे असू शकतात, याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
मुख्य कारण पाहण्यापूर्वी ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नसेल, त्यांना नक्कीच हप्ता मिळणार आहे. यासाठी तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का ? ऑनलाईन चेक केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर दाखवत आहे का ? अर्जाची स्थिती तपासल्यानंतर अर्ज Rejected असं तरी दाखवत नाही का ? या सर्व बाबी तुम्ही ऑनलाईन चेक केल्या पाहिजेत ! तरच तुम्हाला अर्जांमधील त्रुटी समजेल.
पहिलं मुख्य कारण
राज्य शासनाकडून पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. रक्षांबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ, असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आल आहे. त्याची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट 2024 पासून चालू झालेली आहे.
आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी.
दुसरं मुख्य कारण
बँकेत पैसे जमा न होण्याच दुसर मुख्य महत्त्वाच कारण म्हणजे बँक सिडिंग स्टेटस आहे. बँक खाते आधार कार्डशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील, तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही ? हे तपासणे गरजेचे आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
तिसरं मुख्य कारण
तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील, तर घाबरण्याच कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिग, Review, Disapproved, असं दिसत असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील, तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. 17 तारखेपर्यंत म्हणजेच आज तुम्हाला पैसे मिळू शकतात.
📢 हे पण वाचा 👇
| लाडकी बहीण लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण 5 मोठे बद्दल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण फॉर्म चुकला | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण हफ्ता कधी ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण नवीन वेबसाईट | येथे क्लिक करा |
| कोणत्या खात्यात पैसे येणार ? | येथे क्लिक करा |
