Solar Pump Yojana : गेल्या दोन वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या अनुषंगाने शेतकरी महाऊर्जा संकेतस्थळावर कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. नुकतीच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची अधिकृत वेबसाईटसुद्धा शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. परंतु काही बनावट संकेतस्थळाद्वारे किंवा एसएमएसच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
सोलर पंप महत्त्वाची माहिती
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना फक्त महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) विभागाद्वारे राबविण्यात येते. या योजनेसाठी जुनी वेबसाईट व नवीन मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाची वेबसाईट खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत.
कोणत्याही इतर वेबसाईटवर शेतकऱ्यांनी अर्ज करू नये किंवा अर्ज केल्यानंतर पैशाची भरणा करू नये, यासाठी शेतकरी स्वतः जबाबदार असतील; कारण अन्य संकेतस्थळावर भरणा केल्यास पैसे जाण्याची शक्यता असेल.
फसवणूक कशी ओळखावी ?
सध्यास्थितीत शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकासह लाभार्थी यादी सोशल मीडियावर फिरत आहे. याचाच गैरफायदा घेऊन यादीतील क्रमांकावर संपर्क साधून काहीजण शेतकऱ्यांना “निवड झाल्याची माहिती देत” पैशाची मागणी करत आहेत. अशी मागणी पूर्णता बनावट असून शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करावे.
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी की, सेल्फ सर्वेक्षण हा प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा असून सर्वेक्षण फक्त महाऊर्जा अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे करता येतो. यानंतरच ॲप्लिकेशनवर पेमेंट करण्यासाठीचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो, त्यामुळे इतर कोणत्याही एप्लीकेशन किंवा एसएमएसमध्ये आलेल्या लिंकद्वारे पेमेंट करू नये.
बनावट कॉल आणि SMS पासून सावध रहा
ऑनलाइन फिरत असलेल्या लाभार्थी यादीचा फायदा घेऊन काहीजण शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती फोन करत आहेत आणि पैशाची मागणी करत आहेत. यासाठी पर्याय म्हणून लाभार्थ्यांनी कोणत्याही बनावट कॉल किंवा एसएमएसला प्रतिसाद देऊ नये.
- कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका.
- फक्त अधिकृत महाऊर्जा मोबाईल ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट याच्या माध्यमातून सर्व्हे व पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
- जर तुम्ही तुमचा अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर केलेला असेल, तर त्याच वेबसाईटवर तुमच्या अर्जाच्या पेमेंटची भरला करा.
- महाऊर्जा कार्यालयाशी संपर्क साधल्याशिवाय कोणतेही शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरू नका.
महाऊर्जा विभाग सूचना व संपर्क माध्यम
प्रधानमंत्री कृषी योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या बनावट वेबसाईटपासून सावधान राहावे, त्याचप्रमाणे फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. एखादा संदेश किंवा कॉल प्राप्त झाल्यास जिल्ह्यातील महाऊर्जा कार्यालयाशी संपर्क साधूनच खात्री करावी व पुढील प्रक्रिया करावी. खात्री करण्यासाठी खालीलप्रमाणे अधिकृत वेबसाईट व हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे.
- अधिकृत वेबसाईट 01 : येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट 02 : येथे क्लिक करा
- मोबाईल ॲप्लिकेशन : प्ले-स्टोअरवर उपलब्ध
- हेल्पलाइन क्रमांक : 020-35000450
🔖 हे पण वाचा : मागेल त्याला सोलर पंप योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू, याठिकाणी करा ऑनलाईन अर्ज
