Rabbi Crop Insurance Last Date : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपये भरून रब्बी किंवा खरीप पिक विमा योजनेचा लाभ मिळवता येतो. या योजनेला शासनाकडून “सर्व समावेशक पिक विमा योजना” ही संज्ञा देण्यात आलेली होती. त्यानुसार सध्या रबी हंगाम 2024 सुरू असून शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा भरण्यासाठी कृषी विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सदरची योजना अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी विभाग क्षेत्र धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे रब्बी व खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना लागू असेल, यासाठी शेतकऱ्यांना प्रति पीक फक्त 1 रुपया भरावा लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना अदा करण्यात येईल.
रब्बी पीक विमा 2024
खरीप हंगामाप्रमाणे राज्यात Rabi Crop Insurance म्हणजेच रब्बी पिक विमा योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सर्व समावेशक पिक विमा योजना सुरू करण्यात आल्यानंतर देण्यात आली होती. त्यानुसार रब्बी पिक विमा योजनेमध्ये आरोग्य हंगामातील पिके जसे ज्वारी, गहू, मक्का, हरभरा, रब्बी कांदा इत्यादी पिकांचा समावेश असणार आहे. नमूद पिकांचा शेतकऱ्यांना पिक विमा उतरवता येईल.
रब्बी पिक विमा 2024 अर्ज भरण्यासाठी ची सुरुवात 29 ऑक्टोबरपासून सुरू झालेली असून यासाठी बहुतांशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपला रब्बी पिक विमा भरून घेतलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी आता शेवटची काही दिवस शिल्लक राहिलेली आहेत.
विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- जमिनीचा 7/12 उतारा व 8अ उतारा
- शेतकऱ्यांचा आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पीकपेरा स्वयंघोषणापत्र
- 100 च्या बॉण्डवर संमतीपत्र (सामायिक क्षेत्र असल्यास)
पिक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख
रब्बी पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची तारीख (Last Date) खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीतच शेतकऱ्यांना रब्बी पिक विमा योजनेचा लाभ मिळवता येईल.
- गहू/हरभरा : 15 डिसेंबर 2024
- ज्वारी : 30 नोव्हेंबर 2024
पीक विमा अर्ज कुठे करावा ?
रब्बी पिक विमा अर्ज शेतकऱ्यांना स्वतः शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या PMFBY या पोर्टलवरती भरता येईल; परंतु काही शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करता येत नसल्यास त्यांना महा-ई-सेवा केंद्रावरती रब्बी पिक विमाचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
| PMFBY वेबसाईट | येथे क्लिक करा |
| रब्बी स्वयघोषणापत्र | येथे क्लिक करा |
