व्यवसाय करण्यासाठी आता मिळणार 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज : PM Mudra Loan Yojana New Update

PM Mudra Loan Yojana : नमस्कार मित्रांनो, दिवाळीपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी जाहीर करण्यात आलेली आहे. भारत सरकारकडून व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. ज्याअतर्गत आता कर्जाची रक्कम किंवा मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे.

PM Mudra Loan Yojana

आता तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनाअंतर्गत 20 लाख रुपयापर्यंत कर्ज सहजासहजी मिळवू शकता. यापूर्वीही मर्यादा दहा लाख रुपये होती, मात्र आता भारत सरकारकडून दुप्पट करण्यात आली आहे. यामुळे लघुउद्योगांना नक्कीच बळ मिळेल आणि देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे मुद्रा योजनेचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे पूर्ण होईल.

भारत देशातील छोटे व्यवसाय आपला व्यवसाय वाढू शकतील, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना खूपच प्रभावी ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना सरकारकडून कर्ज देऊन मदत केली जाते.

व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुक लोकांना 50,000 रुपयापासून दहा लाखापर्यंत कर्ज मिळत होतं; परंतु आता मोदी सरकारने या कर्जाची मर्यादा वाढवून 20 लाख रुपये केली आहे. याचा अर्थ आता युवा उद्योजक 50,000 ते वीस लाख रुपये पर्यंतचा कर्ज सहजासहजी मिळवू होऊ शकतो.

पीएम मुद्रा योजना प्रकार

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांसाठी तीन प्रकारचे कर्ज वाटप केले जातात. शीशू, किशोर आणि तरुण. या योजनेची शुव कर्जासाठी पन्नास हजार रुपये, किशोर कर्जासाठी 50,000 ते पाच लाख रुपये आणि तरुण कर्जासाठी पाच लाख ते वीस लाख रुपयापर्यंतच कर्ज दिल जातं.

पीएम मुद्रा कर्ज योजना पात्रता

  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही मूळ भारताच्या रहिवासी असायला हवे.
  • प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला कोणत्याही बँकेने कर्ज काढण्यास अपात्र घोषित केले असेल तर या योजनेचा लाभ त्याला दिला जाणार नाही.
  • एखादा व्यक्ती कोणत्याही कर्जासाठी जर अर्ज करत असेल तर त्याला त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती असायला हवी तरच मुद्रा लोन योजनेचे कर्ज दिले जाईल.
  • याशिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड जातीचे प्रमाणपत्र व्यवसायाशी संबंधित सर्व प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे असायला हवी.

PM Mudra Loan Yojana Online Apply

  1. प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  2. यानंतर तुम्हाला तीन प्रकारच्या कर्जाचे पर्याय मिळतील: शिशु, तरुण आणि किशोर कर्ज.
  3. आता तुम्हाला हवे असलेल्या कर्ज पर्यायावर क्लिक करा.
  4. यानंतर तुम्हाला अर्जाची लिंक दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  5. यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घ्यावी.
  6. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि फॉर्मसोबत असलेली आवश्यक कागदपत्रे देखील जोडावी.
  7. हे सर्व केल्यानंतर तुम्ही आता तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन हा अर्ज सबमिट करा.
  8. बँक शाखेतील अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील आणि अर्ज व्यवस्थित भरलेला असल्यास, संपूर्ण दस्तऐवजे व्यवस्थित असल्यास, काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा केली जाईल.
पीएम मुद्रा लोन योजनाअधिकृत वेबसाईट
इतर योजनांची माहितीHOME PAGE
मुद्रा लोन विषयी आणखी सविस्तर माहिती मिळवायेथे क्लिक करा

Leave a Comment