नवीन रेशन धान्य दुकान सुरू करता येणार – या दोन जिल्ह्यांसाठी अर्ज सुरू : New Ration Shop Application

जर तुम्हाला स्वतःचं रेशन धान्य दुकान चालू करायचं असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील सातारा व यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या रेशन धान्य दुकानांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज कोणाला करता येईल ? यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असतील ? अर्ज कसा करावा किंवा अर्ज प्रक्रिया काय असेल ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.

अर्ज कोणाला करता येणार

जर तुम्ही सातारा किंवा यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही गावातील नागरिक असाल, तर तुम्हाला रेशन धान्य म्हणजे स्वस्त धान्य दुकानासाठी अर्ज करता येणार आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी शेवटची तारीख 30 जुलै 2025 देण्यात आलेली असून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी शेवटची तारीख 31 जुलै 2025 देण्यात आली आहे.

जर तुम्ही संबंधित दोन जिल्ह्यातील नागरिकांचा, तर वरील विहित मुदतीत तुम्हाला स्वस्त राशन धान्य दुकानासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

जिल्हा-तालुकानिहाय यादी

सातारा जिल्ह्यातील 141 गावाची यादी खालीलप्रमाणे : ⬇️

तालुका नावगावांची संख्या
वाई15
कराड06
महाबळेश्वर44
कोरेगाव13
खटाव10
फलटण04
पालटण10
माण04
खंडाळा07
जावली08
एकूण गावांची संख्या141

यवतमाळ जिल्ह्यातील 321 गावाची यादी खालीलप्रमाणे : ⬇️

तालुका नावगावांची संख्या
महागाव02
पुसद31
वणी55
घाटंजी20
केळापूर30
घनोराशी/जामणी10
बाबुळगाव13
दारव्हा04
राळेगाव43
यवतमाळ19
कळम25
आर्णी09
दिग्रस06
मारेगाव24
नेर08
एकूण गावांची संख्या321

अर्ज कसा करावा ?

अर्जाचा नमुना संबंधित तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अर्ज घेण्यासाठी रुपये 100 इतका शुल्क भरावा लागेल. अर्ज ग्रामपंचायत, बचत गट, सहकारी संस्था इ. यांच्यामार्फत करता येईल.

अर्जांची निवड प्राधान्य क्रमानुसार केली जाईल. अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Comment