आता प्रत्येक नागरिकांना नवीन पॅन कार्ड काढावा लागणार आहे, यासंदर्भात केंद्र शासनाकडून नुकतीच नवीन पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे. 1 हजार 435 कोटी रुपयांचा हा नवीन पॅन 2.0 प्रकल्प असणार असून हा प्रकल्प संपूर्ण भारतात राबविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित पॅन कार्ड २.० ची घोषणा केली आहे.
सुत्रानुसार दिलेल्या माहितीत नवीन पॅन कार्डवर आता QR कोड असेल, त्यामुळे करदाता व सर्वसाधारण व्यक्तीला याचा नक्कीच फायदा होईल.
आता सर्वांना पडलेला प्रश्न असेल ? जुन्या पॅन कार्डचा आता काय होणार ! यासंदर्भात घाबरण्याचं कारण नाही, पण 2.0 प्रकल्प हा डिजिटल इंडियाचा एक भाग असून या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना नवीन किंवा कोण असणारे पॅन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पॅन 2.0 प्रकल्प ऑनलाईन की ऑफलाईन
केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार ही सर्व प्रक्रिया पेपरलेस असणार आहे; म्हणजेच यासाठी एक पोर्टल तयार करण्यात येईल व ऑनलाईन पद्धतीने यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कोणत्याही पॅन कार्डधारक नागरिकांना नवीन पॅन कार्ड काढण्याची आवश्यकता भासणार नाही, जुन्याच पॅन कार्डला अपग्रेड करावे लागेल. पॅन नंबर जुनाच असेल; परंतु नवीन कार्ड काढावे लागेल.
पॅन 2.0 अंतर्गत करण्यात येणारी ही प्रक्रिया नागरिकांसाठी निशुल्क असेल, म्हणजेच नागरिकांना कोणताही खर्च येणार नाही. विशेष म्हणजे नवीन पॅन कार्ड प्लास्टिक मटेरियल स्वरूपात मिळू शकेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
नवीन पॅन कार्डचे फायदे
- तुमच्या नावावर किती कर्ज आहे ? यासंदर्भातील त्वरित माहिती मिळवण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते.
- लोन घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर किती आहे ? हे तपासण्यासाठी देखील पॅन कार्डची आवश्यकता असते.
- पॅन कार्ड शिवाय बँकेत बचत किंवा चालू खाते काढता येत नाही.
- 50 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करायचा असेल, तर त्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता भासते.
- पॅन कार्डच्या मदतीने तुम्ही करदाता (Tax Payer) आहात का नाही याची माहिती मिळवता येते.
अशा पद्धतीने नवीन पॅन कार्ड काढल्यानंतर वरील विविध फायदे तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप पॅन कार्ड काढलेला नसेल, त्यांना नवीन पॅन कार्ड काढून घ्यावे लागणार आहे. ज्या पद्धतीने आधार कार्डमुळे नागरिकांना विविध सुविधा एकत्र मिळतात, त्याच पद्धतीने आर्थिक व्यवहारा संदर्भातील अचूक माहिती ठेवण्यासाठी व मिळवण्यासाठी नवीन पॅन कार्डची मदत होणार आहे.
