नमो शेतकरी योजना चौथा हप्ता कधी मिळणार ? वाचा सविस्तर माहिती शासन निर्णय आला !

Namo Shetkari Yojana 4th Installment : शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. याअनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय काल दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे.

नमो शेतकरी योजना चौथा हप्ता

नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना चौथा हप्ता अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत शासनाकडून जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. संबंधित निधी हा माहे एप्रिल ते जुलै या महिन्यासाठीचा असेल.

सर्व पात्र शेतकऱ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून रुपये 2041.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रु 20.41 कोटी असा एकूण 2061.66 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

मागील हफ्ता मिळणार

बहुतांश शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता म्हणजेच तिसरा हप्ता मिळालेला नाही, तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता चौथ्या हप्त्यासह मागील थकीत तिसरा हप्तासुद्धा दिला जाणार आहे; परंतु यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित पात्रता धारण करणे आवश्यक असेल. तुम्हाला संबंधित शासन निर्णय डाऊनलोड करावयाचा असेल, तर लेखाच्या सर्वात शेवटी बटन दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सविस्तर शासन निर्णय वाचू शकता.

4था हफ्ता कधी मिळणार ?

शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी निधी मंजुरी देण्यात आलेली असली तरी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार या संदर्भातील निश्चित तारीख किंवा कोणतेही माहिती संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरच निश्चित तारीख जाहीर करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळणार आहे.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Leave a Comment