Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसोबत नमो शेतकरी योजना सुरू केलेली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 4 हफ्ते त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आलेले आहेत. आता पाचवा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार असून त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, काही कागदपत्रे अपलोड करावी लागते का ? याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.
नमो शेतकरी योजना 5वा हफ्ता
नमो शेतकरी योजनेचा पाचवा हफ्ता वितरित करण्यासंदर्भात शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे. संदर्भित शासन निर्णय संपूर्ण वाचण्यासाठी तुम्हाला या लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करण्यासाठीची लिंक देण्यात आली आहे.
नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पाचव्या हफ्त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकूण पात्र लाभार्थ्यांना जवळपास 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येते.
माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी सन्माननिधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या आधी कधीही दिला जाऊ शकतो.
🤔 शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर्षी होणार का ?
चौथा हप्ता येण्यासाठी लाभार्थ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली होती; परंतु आता हा हफ्ता पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या दरम्यान मिळू शकतो, असा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. खालील बटणावर क्लिक करून जीआर डाऊनलोड करा आणि संबंधित संपूर्ण निधी वितरणाची माहिती वाचून पहा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
