लाडकी बहीण योजना नवीन वेबसाईट शासनाकडून सूरू, आता या वेबसाईटवर करा ऑनलाईन अर्ज

Ladki Bahin Website : महिलांना दरमहा आर्थिक मदत म्हणून 1500 रु. देण्यासाठी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना घोषित करण्यात आली. यासाठी पात्र महिलांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शासनाकडून नारीशक्ती दूत नावाचा ॲप विकसित करण्यात आलेला होता. आता या सोबतच शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजना वेबसाईट

यापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडीत ऑफलाइन अर्ज करावा लागत असेल किंवा ऑनलाईन अर्जासाठी शासनाकडून विकसित करण्यात आलेल्या नारीशक्ती दूत ॲपचा वापर करावा लागत असत; परंतु मोबाईलमधील नारीशक्ती दूत ॲपच्या काही तांत्रिक अडचणीमुळे महिलांना अर्ज सादर करता येत नव्हता. काहीवेळी ॲप हँग होत असल्याने अनेकांना डोकेदुखी झाली होती. या सर्व बाबींचा विचार करता आता नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

बहुतांश महिलांना किंवा अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज करत असताना नारी शक्ती दूत ॲपच्या आणि समस्या येत होत्या. काहीवेळी ॲपमध्ये संपूर्ण माहिती भरून कागदपत्र अपलोड करताना ॲप हँग होऊन बाहेर टाकला जायचा, त्यामुळे या सर्व अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजना नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे.

या वेबसाईटवर करा ऑनलाईन अर्ज

लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज वेबसाईटवर करता येणार आहे. यासाठीची प्रक्रिया नारी शक्ति दूत ॲपप्रमाणेच असणार असून यासाठी कोणतेही तांत्रिक अडचण येणार नाही. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की ? लाडकी बहीण योजना नवीन वेबसाईट कोणती आहे ? खाली तुम्हाला एक बटन देण्यात आलेली आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नवीन वेबसाईटवर जाऊ शकता.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

वरील देण्यात आलेल्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती मिळून जाईल. ज्यामध्ये संबंधित योजनेचा जी.आर, अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी पात्रता आणि इतर आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे. या वेबसाईटवर त्वरित अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली असून विनाविलंब अद्याप ज्या महिलांनी अर्ज केला नसेल किंवा ज्यांचा अर्ज रद्द झाला असेल, त्यांनी त्वरित अर्ज करावा.

📚 हे पण वाचा 👇

लाडकी बहीण लाभार्थी यादीयेथे क्लिक करा
लाडकी बहीण 5 मोठे बद्दलयेथे क्लिक करा
लाडकी बहीण फॉर्म चुकलायेथे क्लिक करा
लाडकी बहीण हफ्ता कधी ?येथे क्लिक करा

Leave a Comment