Ladki Bahin Yojana 2100 Rs : लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना शासनाकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. शासनाकडून घोषित करण्यात आल्याप्रमाणे शासनाकडून घोषित करण्यात आल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आता योजनेचे 2100 रुपये पुढच्या वर्षी दिले जाणार आहेत. या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तर हे माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.
Ladki Bahin Yojana 2100 Rs कधी मिळणार ?
महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहिण योजनेअंतर्गत महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे आश्वासन करण्यात आले होते. महायुती जाहीरनामाचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केला आहे. इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये बोलताना मुनगंटीवार यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या वाढीव स्वरूपातील रक्कम केव्हापासून मिळणार आहे.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याद्वारे देण्यात आलेल्या माहिती आता सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच लाडकी बहिणी योजनेअंतर्गत वाढीव पैसे दिले जाणार नाहीत. लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता देण्यासाठी खूप वेळ महिलांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. जसं सरकार स्थापन होईल तसं लगेच याचा निर्णय घेता येणार नाही, अशी माहिती मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली.
📢 लाडकी बहीण लाभार्थी यादी ऑनलाईन या ठिकाणी बघा !
यासोबतच लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पातून राखीव ठेवलेल्या 45 हजार कोटीचा निधी कमी पडत आहे, यापूर्वी 1500 प्रमाणे हा निधी ठरविण्यात आलेला होता; परंतु आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागेल.
2100 रुपये कधीपासून मिळणार ?
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार ज्याप्रमाणे सुरुवातीला महिलांना रक्षाबंधनाला लाडके बहिण योजनेचा पहिला हप्ता देण्यात आलेला होता, त्याचप्रमाणे 2100 रुपयांचा वाढीव हप्ता आता भाऊबीजला पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच भाऊबीज येण्यासाठी जवळपास तब्बल दहा महिन्याचा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता वाढीव 2100 रुपयांचा निधी मिळण्यासाठी 10 महिने वाट पाहावी लागेल.

2025 मध्ये भाऊबीज 23 ऑक्टोबरला येत आहे, त्यामुळे 23 ऑक्टोबर 2025 नंतर लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करून महिलांना प्रति महिना 2100 रुपये दिले जाऊ शकतात.
वाढीव रकमेसाठी उशीर का ?
लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यासाठी सरकारकडे सध्या खूप अडचणी आहेत. कोणत्याही योजनेबद्दल बदल करायचा असेल, तर शासन निर्णय (GR) च्या माध्यमातून बदल करावा लागतो. जीआर काढण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अगोदर मंजूर करण्यात आलेला निधी पुरेसा नाही आहे.
📢 लाडकी बहीण योजना कोणत्या बँक खात्यात पैसे येणार ? जाणून घ्या
या अगोदर 45 करोड रुपये या योजनेसाठी राखीव ठेवण्यात आलेले होती; परंतु आता हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे 45 हजार करोड रुपये हा पुढे पडत असल्याने सध्या तरी 2100 रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी हा खूप मोठा धक्का आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना 2100 रुपयांच्या हप्त्याची खूपच आशा होती; परंतु त्यांच्यासाठी ही खूप निराशाजनक बातमी आहे.
राज्य सरकारकडून मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर करताना लाडकी बहीण योजनेसाठी जास्त निधी दिला आणि हप्ता वाढवण्यासाठी जास्त प्रयत्न केल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता लवकरच मिळू शकतो, अशी आशा आहे.
📢 ही माहिती पण वाचा :
| लाडकी बहीण लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण 5 मोठे बद्दल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण फॉर्म चुकला | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण हफ्ता कधी ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण नवीन वेबसाईट | येथे क्लिक करा |
| कोणत्या खात्यात पैसे येणार ? | येथे क्लिक करा |
