लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार केवळ 1 रु. काय आहे सत्य ? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

1 Rs DBT Transfer : महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. याचा चांगला प्रतिसाद राज्यातील महिलांकडून मिळत आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या पात्र महिला आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये केवळ १ रुपयात जमा होणार, असा संदेश काही लोकांना मिळत आहे, तर या संदर्भातील खरे सत्य काय आहे ? याबद्दलची थोडक्यात माहिती आपण संबंधित लेखात पाहणार आहोत.

लाडक्या बहिणींना १ रु. मिळणार का ?

संबंधित पात्र महिलांच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा संदेश आल्यानंतर बहुतांंश अर्ज केलेल्या महिलांची चिंता वाढलेली आहे; परंतु खरं सत्य काय आहे ? या संदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा बोलबाला सुरू आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती शासनाच्या महासंवाद या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्वात शेवटी देण्यात आलेल्या बटनावर क्लिक करून तुम्ही अधिकृत माहिती सविस्तरपणे वाचू शकता.

1 रुपया का जमा होणार ?

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांना लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात DBT Transfer पद्धतीने एक रुपया जमा करण्यात आला आहे किंवा जमा होईल. जमा होणारा हा रुपया लाभार्थ्यांच्या सन्मान निधीचा नसून तो फक्त तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदती तटकरे यांनी केले आहे.

📢 हे पण वाचा : लाडक्या बहिणींना वर्षाला मिळणार मोफत ३ सिलेंडर

या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत, या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे.

ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी पात्र महिलांना निश्चितच संपूर्ण लाभ रक्कम वितरित करण्यात येईल. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, अशी माहिती सुध्दा महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

📚 हे पण वाचा 👇

लाडकी बहीण लाभार्थी यादीयेथे क्लिक करा
लाडकी बहीण 5 मोठे बद्दलयेथे क्लिक करा
लाडकी बहीण फॉर्म चुकलायेथे क्लिक करा
लाडकी बहीण हफ्ता कधी ?येथे क्लिक करा
लाडकी बहीण नवीन वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment