MTSKPY Solar Pump : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या सौर पंपाची योजना मागेल त्याला सोलर पंप योजना (Magel Tyla Saur Krushi Pump) आजपासून शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. 13 सप्टेंबर 2024 पासून या योजनेची सुरुवात झालेली असून महाराष्ट्रात सौर पंपांना सर्वाधिक मागणी आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यास लवकरच सुरुवात होईल. संबंधित योजनेच्या माध्यमातून आता 8 लाख सौर पंपाचे वितरण करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली आहे. या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवाहन केले जाईल, परंतु शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात होताच त्वरित अर्ज सादर करावे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही योजनेअंतर्गत सौर पंपाचा लाभ घेतलेला नसेल, अशा सर्व शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप योजनेचा लाभ मिळणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
जर एखाद्या शेतकऱ्यांनी कुसुम सौर पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा महावितरणच्या माध्यमातून सौर पंपाचा लाभ घेतलेला असेल, तर अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप योजनेचा लाभ मिळणार नाही. मागेल त्याला सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? या संदर्भातील माहिती लवकरच अर्ज सुरू झाल्यानंतर आमच्यामार्फत देण्यात येईल. तरी अशाच प्रकारचे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा !
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
