50000 अनुदान थकीत यादी आली ! केवायसी केल्यानंतरच जमा होणार कर्जमाफी अनुदान : Loan Waiver

Loan Waiver Pending List : ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेला कर्ज नियमित भरणा केलेला असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केलेली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. ही यादी तुम्हाला कशी डाऊनलोड करता येईल ? यादीमध्ये तुमचं नाव कसं शोधावं ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण संबंधित लेखात पाहणार आहोत.

50000 अनुदान कर्जमाफी यादी

यापूर्वी तुमचं सुद्धा यादीत नाव आलेलं असेल आणि तुम्ही काही कारणास्तव eKyc केलेली नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या मयत व्यक्तीच्या नावावरील कर्ज तुमच्या नावाने या यादीत दर्शवीत असेल, तर तुम्ही यादीत नाव असल्यास 50 हजार अनुदान कर्जमाफीचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावाची यादी डाऊनलोड करून तुमचं नाव शोधावं लागेल.

जर तुमच्या गावातील यादीत तुमचं नाव असेल, तर तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने किंवा आधार लिंक मोबाईल ओटीपीच्या पद्धतीने आधार प्रमाणीकरण प्रक्रिया म्हणजेच eKyc करावी लागेल. केवायसी केल्यानंतर पुढील काही दिवसात मंजूर करण्यात आलेली कर्जमाफी अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल.

लाभार्थी यादी अशी डाऊनलोड करा

लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सीएससी पोर्टलला भेट द्यावी लागेल. सीएससीच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही खालीलप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यादी डाऊनलोड करू शकता.

  1. सीएससीच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुमचा सीएससी आयडीपासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
  2. त्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या Aadhar Authentication List Download या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची Pending लिस्ट दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
  4. लिस्टवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड या चिन्हावर क्लिक करून तुम्ही थकीत कर्जमाफी यादी पाहू शकता.
  5. यादी डाऊनलोड केल्यानंतर Village या Excel File च्या फिल्टरचा वापर करून तुम्ही तुमच्या गावातील यादी पाहू शकता.
  6. डाऊनलोड करण्यात आलेल्या 50 हजार अनुदान यादीतील शेतकऱ्यांना eKyc करावी लागेल.
  7. eKyc केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती कर्जमाफी अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Leave a Comment