Magel Tyala Solar Pump Vender Selection : सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी 2015 पासून शासनाकडून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसुम सोलर पंप योजना अशा विविध योजना राबविण्यात आलेले आहेत.
सध्यास्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप शेतकऱ्यांना बसवून देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास 2 लाख 63 हजार 156 सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना सौर पंपाचा होत असलेला लाभ व मागणी लक्षात घेता शासनाकडून काही महिन्यापूर्वी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर करण्यात आली आहे.
सौर कृषी पंप वेंडर निवड प्रक्रिया
आता मागेल त्याला सौर कृषी पंपा संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून प्रक्रिया शुल्क भरली असेल अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता सौर पंप कंपनी निवडीचा पर्याय (Vender Selection) उपलब्ध झाला आहे. संबंधित लेखात आपण वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी ? यासंदर्भातील माहिती पाहणार आहोत.
ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज केलेला असेल सोबतच पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्ज सबमिट असेल, अशा शेतकऱ्यांना आता वेंडर (सोलर कंपनी) निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रथम टप्प्यात 15 वेंडर म्हणजेच सौर कृषी पंप कंपन्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या उपलब्धतेनुसार सोलर पंप कंपनी निवडता येईल.
सोलर पंप वेंडर निवड कशी करावी ?
- सर्वप्रथम महावितरणच्या या www.mahadiscom.in/solar_MTSKPY अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा.
- महावितरणच्या पोर्टलवर जाऊन “लाभार्थी सुविधा हा पर्याय निवडा.
- लाभार्थी सुविधा पर्यायात अर्जाची सद्यस्थिती तपासा.
- आपला अर्ज क्रमांक टाका. आपल्या एमटीआयडी / एमएसआयडी / एमकेआयडी या क्रमांकाचा वापर करून अर्जाची माहिती शोधा.
- त्यांनतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल. आपले पेमेंट पूर्ण झालेले दिसेल.
- यानंतर वेंडर निवड करा
- वेंडर निवडीसाठी उपलब्ध यादी तुम्हाला दिसेल. आपल्याला तीन एचपी, पाच एचपी, किंवा साडेसात एचपी क्षमतेसाठी वेंडर निवडता येईल.
- तुमच्या जिल्ह्यात जिथे वेंडर उपलब्ध असेल त्याची यादी तुम्हाला दिसेल.
- वेंडर निवडून Assign या बटनावर क्लिक करा.
- तुमच्या पसंतीचा वेंडर निवडून Assign Vendor पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर OTP प्रक्रिया पूर्ण करा.
- वेंडर निवडल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल, OTP सबमिट करून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.
- तुमच्या जिल्हात त्या vendor ने कसे काम केले आहे आणि कुठे इन्स्टॉलेशन केले आहे, ती सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
- वरील सर्व प्रोसेस केल्यावर तुमची vendor selection होणार आहे.
📢 हे पण वाचा भाऊ :
| सोलर पंप फसवणूक टाळा | येथे क्लिक करा |
| मागेल त्याला सोलर वेबसाईट | येथे क्लिक करा |
| सोलर पंप स्टेटस चेक | येथे क्लिक करा |
| कुसुम सोलर जुनी यादी | येथे क्लिक करा |
| छत सोलर पॅनल अनुदान | येथे क्लिक करा |
