एलआयसी विमा सखी योजना सुरू, निकष काय असतील ? किती पैसे मिळणार ? अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती

LIC Bima Sakhi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महिलांसाठी एक विशेष नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव एलआयसी विमा सखी योजना असून संपूर्ण देशभरासाठी हे योजना लागू असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणातून विमा सखी योजना लॉन्च केली आहे. या योजनेचा उद्देश देशातील महिलांना आर्थिक स्वरूपात साक्षर व आत्मनिर्भर करणे हा आहे.

या योजनेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या महिलांना “विमा सखी” या नावान ओळखलं जाईल. त्यासाठी महिलांना विमा पॉलिसी काढण्याचं काम करावं लागणार आहे, विमा पॉलिसी काढल्यानंतर त्यासाठी महिलांना मदत म्हणून बोनस व निश्चित रक्कम दिली जाईल.

LIC विमा सखी योजना काय आहे ?

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसीकडून ही नवीन योजना विशेष महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक महिलांना सुरुवातींना तीन वर्ष ट्रेनिंग दिल जाणार आहे. ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांची वित्तीय समाज वाढवली जाईल तसेच त्यांना विम्याचे महत्त्व समजावून देण्यात येईल.

ट्रेनिंग कालावधीत महिलांना शासनाकडून मानधन देखील देण्यात येईल. ट्रेनिंग नंतर संबंधित महिलांना एलआयसी विमा एजंटच्या स्वरूपात काम करता येईल. यामध्ये बीए (B.A) पास असलेल्या महिलांना विकास अधिकारी म्हणजेच डेव्हलपमेंट अधिकारी बनण्याची संधी मिळू शकते.

LIC विमा सखीसाठी पात्रता

  • विमा सखी योजनेसाठी फक्त महिलांनाच अर्ज करता येईल.
  • महिलांकडे दहावी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • विमा सखी योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील महिला अर्ज करू शकतील.
  • तीन वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला विमा एजंटच्या स्वरूपात काम करू शकतील.

Bima Sakhi Yojana नियम काय?

एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत तीन वर्षाच्या ट्रेनिंगनंतर महिलांना एलआयसी एजंट म्हणून नियुक्ती देण्यात येईल. पण एलआयसीच्या ती नियमित कर्मचारी नसतील. तसंच नियमित कर्मचाऱ्यांचे कोणतेही लाभ संबंधित महिला एजंटला मिळणार नाहीत. ज्या महिलांची विमा सखी म्हणून निवड करण्यात येईल, त्यांना प्रत्येक वर्षी विमा पॉलिसी काढून आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल.

विमा सखीना पैसे किती मिळणार ?

विमा सखी महिलांना ट्रेनिंग कालावधी दरम्यान २ लाखापेक्षा अधिक मानधन देण्यात येईल. यापैकी पहिल्या वर्षी ७ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ६ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५ हजार रुपये मानधन देण्यात येईल. यामध्ये बोनस किंवा कमिशनचा समावेश असणार नाही.

यामध्ये एक महत्त्वाची अट ठेवण्यात आलेली आहे, ती म्हणजे महिला एजंट ज्या पॉलिसी विकतील त्या पॉलिसीपैकी 65 टक्के पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सक्रिय राहायला हव्यात. उदा. एखाद्या महिलेने वर्षभरात १०० पॉलिसी विकल्या, तर 65 पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत राहायला हव्यात. याचा अर्थ असा की महिलांनी फक्त पॉलिसी विकायच्या नाहीत, तर पॉलिसी चालू राहतील याची सुद्धा काळजी घ्यावयाची आहे.

LIC विमा सखी योजना ऑनलाईन अर्ज

  • एलआयसी विमा सखी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पात्र महिलांना एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटी Click here for Bima Sakhi या पर्यायावर क्लिक करा.
  • त्या ठिकाणी अर्जदार महिलांच नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि पत्ता इत्यादी संपूर्ण माहिती भरून घ्या.
  • जर तुम्ही एलआयसीचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर याच्याशी संबंधित असाल, तर त्याची देखील माहिती त्या ठिकाणी द्या.
  • शेवटी कॅपचा कोड भरून अर्ज दाखल करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Leave a Comment