शेतकऱ्यांना गेल्या वर्षापेक्षा यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळणार ! काय आहे माहिती नक्की वाचा

आर्थिक वर्ष 2024-25 साठी सोयाबीनचा हमीभाव (Soyabean MSP) शासनाकडून ठरविण्यात आलेला असून तो 4892 रुपये इतका आहे. गेल्या वर्षापेक्षा 299 रुपयांनी अधिकचा भाव यावर्षी शेतकऱ्यांना मिळणार आहे. सोयाबीन खरेदीसाठी शासनाकडून विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आलेली असून त्यांची संख्या आणखी वाढवणार असल्याची माहिती राज्य शासनाच्यावतीने देण्यात आलेली आहे.

यंदा सोयाबीनला चांगला भाव

राज्यात सन 2024-25 मधील खरीप हंगामातील सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली असून शेतकऱ्यांची आस आता रासणी झाल्यानंतर सोयाबीनचा भाव किती असणार यावर येऊन थांबली आहे. केंद्रशासनाने सन 2024-25 साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल रु. 4892/- इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर मागील सन 2023-24 या वर्षाच्या हमीभावापेक्षा रु. 292 प्रती क्विंटल इतका जास्त आहे.

महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी नाफेड व एन.सी.सी.एफ तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली आहे.

सदर बैठकीमधील चर्चेनुसार हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत प्रथमता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व विदर्भपणन महासंघ नागपूर यांच्यावतीने राज्यात सोयाबीन खरेदी करिता शेतकरी नोंदणी दिनांक 1/10/2024 पासून सुरू करण्यात आली आहे.

सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी

केंद्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही नोडल एजन्सीसोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदीकरिता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करण्यात येणार आहे. ज्याअंतर्गत नाफेड व एन.सी.सी.एफ कार्यालयाने 26 जिल्ह्यातील एकूण 256 खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 242 खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहेत. कार्यान्वित झालेल्या खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी ही योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीकरिता आपल्या नाफेड NCCF केंद्रावर जाऊन सातबारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबुक दाखल करून प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी.

विक्री व्यवस्थापनाच्या चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने शेतकऱ्यांना SMS प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन जावे अशी सूचना देण्यात आली आहे. आज पर्यंत जवळपास 5000 शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून याबाबत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Comment