लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार ? अदिती तटकरे यांच्याकडून माहिती

Ladki Bahin Yojana Third Installment : राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये दिले जात आहेत. काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत ? सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये कधीपर्यंत जमा करण्यात येतील ? यासंदर्भातील महत्वाची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

बालविकास मंत्री काय म्हणाल्या..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात विस्तारत जाणार आहे का ? असा प्रश्न विचारला असता मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1 कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ (Benefit) देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

आदिती तटकरे यांनी पुढे म्हणाल्या की, “सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले असतील, त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, 2 कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात यावा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

योजनेसाठी मुदत कधीपर्यंत

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मुदतीबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, “पहिल्या टप्प्यातील मुदत ही 1 जुलै ते 1 ऑगस्ट होती. या कालावधीत ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले. त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला, तर काहींना मिळणार आहे. या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरुच राहणार आहेत.

📢 तुमच्या खात्यात आणखी 3,000 रु. जमा झाले नाहीत का ? काय करावं – माहिती वाचा..

आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत. ज्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे, त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील आम्ही लाभ लवकरच वितरीत करणार आहोत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले आहेत. त्यांना देखील लाभाची सुरुवात याच महिन्यात होईल. तसेच सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे, तो लाभ पात्र महिलांना लवकरच वितरीत करण्यात येईल”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

📢 ही पण माहिती वाचा….👇

लाडकी बहीण लाभार्थी यादीयेथे क्लिक करा
लाडकी बहीण 5 मोठे बद्दलयेथे क्लिक करा
लाडकी बहीण फॉर्म चुकलायेथे क्लिक करा
लाडकी बहीण हफ्ता कधी ?येथे क्लिक करा
लाडकी बहीण नवीन वेबसाईटयेथे क्लिक करा
कोणत्या खात्यात पैसे येणार ?येथे क्लिक करा

Leave a Comment