Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत देण्यात आलेला आश्वासन पूर्ण होताना दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजना हफ्ता सुरु
2024 च्या विधानसभा निवडणुकापूर्वी सुरू झालेल्या या योजनेबाबत सरकारने आश्वासन दिले होते की, नवीन सरकार निवडून आल्यानंतर ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने आपले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मासिक हप्त्यांचे वितरण पुन्हा सुरू केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वितरण थांबविण्यात आले होते. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हप्ता सुरू झाल्याची स्पष्टता दिली. 23 डिसेंबर पासून हप्ता वाटप सुरू झालेला असून संपूर्ण वाटप पुढील सात दिवसात पूर्ण होईल.
हफ्ता वाटप किती महिलांना ?
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजना ऑगस्ट 2024 रोजी सुरू करण्यात आलेली होती. तुझ्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये मासिक मदत देण्याचे ठरविण्यात आले होते.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला यश मिळवून देण्याचे श्रेय या उपक्रमाला जाते. मंत्री आदिती तटकरे यांच्या सांगण्यानुसार सध्यास्थितीत लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल 2.34 लाभार्थी महिलांना लाभ दिला जातो.
2100 रु हफ्ता कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजनेबाबत माहिती सरकारकडून दरमहा देण्यात येणारी मदत वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला शासनाकडून 1500 रुपये दरमहा देण्यात येत आहेत. ही रक्कम वाढवून नवीन सरकारच्या काळात 2100 रुपये देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती.
आता वाढीव 2100 रुपयांची मदत पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे; पण यापूर्वी प्राप्त तक्रारीच्या आधारे लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार असल्याची पण माहिती देण्यात आली आहे.
📢 ही माहिती पण वाचा :
| 2100 रु . कधी मिळणार ? | येथे क्लिक करा |
| अर्जाची पुन्हा पडताळणी होणार | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण 5 मोठे बद्दल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण फॉर्म चुकला | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण हफ्ता कधी ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण नवीन वेबसाईट | येथे क्लिक करा |
| कोणत्या खात्यात पैसे येणार ? | येथे क्लिक करा |
