खेड्यापाड्यातील महिलांसाठी बचत गट वरदानापेक्षा कमी नाही. कारण बचत गटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून विविध परतावे किंवा म्हातारपणीचे पेन्शन इत्यादी विविध बाबी बचत गटाच्या माध्यमातून महिला साधू शकतात. सध्याच्या काळाला बचत गट ही महिलांसाठी चांगली संधी मानली जात आहे.
लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारणी, बचत गटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकातून विविध परतावे अशा विविध नियोजनबद्ध अनेक संधी महिलांसमोर उपलब्ध झालेल्या आहेत. ही रक्कम महिलांचे आर्थिक बळ सक्षम करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे.
लाडकी बहिण योजना बचत गट संकल्पना
लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पैशाचे काय करावे ? असा बहुतांश महिलांसमोर प्रश्न होता. आर्थिक साक्षरतेअभावी या रकमेच्या वापरातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण न होता ही रक्कम घरातील खर्चासाठी महिलांकडून वापरली जात आहे. परंतु प्रत्यक्षात या रकमेचा चांगला फायदा घेऊन कर्जाची पत मिळून एखादा व्यवसाय उभा करता येऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये शासनाकडून यापूर्वी दिले जात होते, आता महायुतीच सरकार आल्यानंतर महिलांना दरमहा 1500 रु ऐवजी 2100 रु दिले जाणार आहेत. त्यामुळे रक्कम वाढल्यास महिलांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. या विविध संधी कश्या असतील तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.
- मासिक रक्कम : 1500 रुपये
- पाच वर्षातील रक्कम : 90 हजार रुपये
- पाच वर्षाच्या परतफेडीचे 1 लाख रुपयाचे कर्ज
- कर्जातून स्वतःचा यंत्रसामग्र खरेदी व व्यवसायाची संधी
- SIP गुंतवणुकीने आयुष्यभराचा वार्षिक 7260 रुपये प्रति वर्षे उत्पन्न
- महिलांना बचत गटात सहभागी होऊन सामूहिक व्यवसाय करणे शक्य
एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान)
एसआयपीमध्ये महिलांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. कारण ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानले जाते. ह्या गुंतवणुकीत वार्षिक परतावा एसडब्ल्यूपी आयुष्यभरासाठी मिळवता येतो. तसेच गुंतवलेले रकमेची मार्केट व्हॅल्यू देखील वाढत जाते. विशेष म्हणजे हे मासिक मानधनात 1500 रुपयांची भर घालून जर 3000 रुपये करून एसआयपीमध्ये गुंतवले तर महिन्याला 1200 रुपया आयुष्यभरासाठी मिळतात.
✓ मासिक गुंतवणूक : 1500 रुपये
✓ पाच वर्षातील गुंतवणूक : 90 हजार रुपये
✓ पाच वर्षानंतरचे व्याज : 31 हजार 600 रुपये
बचत गटातून व्यवसायाच्या संधी
बचत गटात गुंतवणूक केल्यास शासनाकडून अत्यल्प कमी व्याजदरात व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. महिलांसाठी विशेष व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदर कर्जाची सुविधा शासनाकडून करण्यात आलेली आहे. ज्यावर व्याजदरात देखील सवलत असते.
✓ बचत गटात गुंतवणूक : 100 रुपये महिना
✓ पाच वर्षात होणारी बचत : 6 हजार रुपये
✓ व्यवसायासाठी मिळणारे गटाचे कर्ज: दीड ते तीन लाख रुपये
✓ व्यवसायाच्या उत्पन्नापासून कर्जाची परतफेड पूर्ण
✓ कर्ज परतफेडची जबाबदारी सामूहिक
✓ इतर महिलांच्या मदतीने सुरक्षित व्यवसाय
1 लाखात व्यवसायाच्या संधी
राष्ट्रीयकृत बँकेचे वैयक्तिक कर्ज घेऊन पाच वर्षात लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून कर्ज परतफेड करता येईल. तसेच मिळालेल्या कर्जातून शिलाई मशीन, पापड मशीन, गिरणी यासारखी यंत्रसामग्री खरेदी करून व्यवसाय सुरू करता येईल.
- कर्जाची रक्कम : 1 लाख रुपयापर्यंत
- कर्जाचा व्याजदर : 6.5 टक्के
- कर्जाचा हप्ता : 1957 रुपये प्रति महिना
- कर्जाची परतफेड : पाच वर्ष
वरीलप्रमाणे महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी मिळणाऱ्या मानधनाची रक्कम एखाद्या व्यवसायात गुंतवली, तर त्यातून कायमचा रोजगार व कमाई सुरू होऊ शकते. यंत्रसामुग्री घेऊन व्यवसाय केला, तर तो कायमचा व्यवसायचा स्त्रोत महिलांना मिळू शकतो. जर एसआयपी किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यास उत्तम परतावा व मार्केट व्हॅल्यूनुसार चांगली रक्कम मिळू शकते.
📢 ही माहिती पण वाचा :
| लाडकी बहीण लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण 5 मोठे बद्दल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण फॉर्म चुकला | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण हफ्ता कधी ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण नवीन वेबसाईट | येथे क्लिक करा |
| कोणत्या खात्यात पैसे येणार ? | येथे क्लिक करा |
