लाडकी बहीण योजना तिसरा हफ्ता या दिवशी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार : Ladki Bahin Yojana 3rd Installment

3rd Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता महिलांना वितरित करण्यात आल्यानंतर आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा बहुतांश महिलांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार, याकडे महिलांच लक्ष लागलेलं आहे. आता ही प्रतीक्षा संपलेली असून मुख्यमंत्रि लाडकी बहीण योजनेचा 3रा हफ्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजना 3रा हफ्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रु. देण्यासाठीची घोषणा शासनाकडून करण्यात आली. या अगोदर नोंदणी केलेल्या व पात्र ठरलेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यावरती एकत्रित दोन महिन्यांचे 3000 रु. देण्यात आले होते. आता उर्वरित तिसरा हप्ता पुढील 29 सप्टेंबर 2024 पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

ज्या महिलांचे अर्ज रद्द झालेले असतील अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज सादर करता येणार आहे. अर्थात सप्टेंबर महिना संपत आलेला असून ज्या महिलांनी त्यांचे अर्ज परत सादर केलेले नसतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

अर्ज सादर करत असताना अनेक महिलांचे काही कारणाचं अर्ज बाद झाले आहेत. अर्जामध्ये दुरुस्तीसाठी अर्जदार महिलांनी आपल्या अर्जातील त्रुटी लक्षात घेऊन व्यवस्थित कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. कोणती कागदपत्र लागतील या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे रखान्यात देण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजना पैसे मिळत नसतील तर..

बहुतांश महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. आता 29 सप्टेंबर 2024 पासून तिसऱ्या हप्त्याचे वितरणसुद्धा होणार आहे. जर तुम्हाला अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसतील, तर तुम्ही खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हवे असतील, तर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असून चालणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला शासनाकडील अनुदान मिळवण्याकरिता NPCI फॉर्म भरून संबंधित बँकेत द्यावा लागेल. NPCI फॉर्म डाऊनलोड करण्यासाठीची लिंक खालील रखान्यात देण्यात आलेली आहे.

कोणत्या महिलांना मिळणार लाभ

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिलांना शासनाकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाभ मिळवताना महत्त्वाची अडचण लक्षात घेता महिलांनी आपल्या बँक लाभ मिळवताना महत्त्वाची अडचण लक्षात घेता महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून बँकेत NPCI फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही याबाबतची स्थिती तपासण्याची संपूर्ण माहिती खालील रखान्यात देण्यात आलेली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती वाचून तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असल्याची खात्री करून घेऊ शकता.

तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असल्यास लवकरात लवकर या त्रुटी दूर करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा येत असलेला तिसरा हप्ता तुमच्या बँक खात्यात लवकरच शासनाकडून वितरित करण्यात येईल.

📢 ही माहिती पण वाचा..

लाडकी बहीण लाभार्थी यादीयेथे क्लिक करा
लाडकी बहीण 5 मोठे बद्दलयेथे क्लिक करा
लाडकी बहीण फॉर्म चुकलायेथे क्लिक करा
लाडकी बहीण हफ्ता कधी ?येथे क्लिक करा
लाडकी बहीण नवीन वेबसाईटयेथे क्लिक करा
कोणत्या खात्यात पैसे येणार ?येथे क्लिक करा

Leave a Comment