लाडकी बहीण कर्ज योजना आता महिलांना मिळणार 0 टक्के व्याजदराने कर्ज : Loan Scheme

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना आता १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ० टक्के व्याजदराने मिळणार आहे. ही माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.

ही महत्वपूर्ण घोषणा १९ जून २०२५ रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली योजनेतून महिलांना ९ टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याही पुढे जात, मुंबई जिल्हा बँकेने ० टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. दरेकर यांनी सांगितले.

लाडकी बहीण कर्ज योजना हेतू

ज्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा नियमित लाभ मिळतो आहे, त्यांनी जर एकत्र येऊन एखादा छोटा उद्योग किंवा व्यवसाय सुरू केला, तर गावागावातील बेरोजगारीवर नक्कीच मोठा उपाय होऊ शकतो.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ०% व्याजदराने १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जात आहे. विशेष म्हणजे या कर्जाचा हप्ता महिलांना मिळणाऱ्या नियमित हफ्त्यातूनच वजा केला जाणार आहे. त्यामुळे वेगळा आर्थिक भार पडणार नाही. तुमच्या घरात, शेजारी किंवा ओळखीतील कोणी महिला या योजनेसाठी पात्र असतील, तर त्यांना नक्की ही माहिती द्या. कारण ग्रामीण भागात अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांचं स्वप्न अर्धवट राहून जातं.

० टक्के व्याजदराने मिळणाऱ्या या कर्जामुळे महिला आता व्यवसायासाठी स्वतःचं पाऊल उचलू शकतील. छोट्या दुकानापासून ते अन्नप्रक्रिया, शिवणकाम, दुग्धव्यवसाय अशा अनेक संधी त्यांच्यासाठी खुले होणार आहेत.

सध्या याठिकाणच्या महिलांना लाभ

ही योजना विशेषत: मुंबई आणि उपनगरातील पात्र महिलांसाठी राबविण्यात येत आहे. आता या योजनेत सहभागी महिलांना ० टक्के व्याजदराने १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. हे कर्ज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून दिले जाणार असून सध्या मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जवळपास १६ लाख महिला लाभार्थी आहेत.

सध्या ही योजना फक्त मुंबईपुरतीच मर्यादित असली, तरी लवकरच ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे. जेव्हा ही योजना राज्यभर लागू होईल, तेव्हा हजारो ग्रामीण व शहरी भागांतील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळेल.

या योजनेचा उपयोग महिलां वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपात कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात. शिवणकाम, किराणा दुकान, फूड प्रॉडक्ट्स, हस्तकला, डेअरी, ब्यूटी पार्लर अशा विविध क्षेत्रांत आता महिलांना पाऊल टाकणे अधिक सोपे होईल.

लाडकी बहीण कर्ज योजना स्वरुप

योजना संपूर्ण नावलाडकी बहीण कर्ज योजना 2025
पात्र लाभार्थी कोणलाडकी बहीण योजनेतील पात्र महिला
कर्ज रक्कम किती1 लाख रुपयापर्यंत
कर्ज स्वरुप प्रकार वैयक्तिक किंवा सामूहिक
योजना उद्देश व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी
व्याजदर किती 0 टक्के
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

हा निर्णय राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. योजनेतून महिलांना छोट्या उद्योग, व्यवसाय किंवा इतर उपजीविकेच्या उपक्रमांसाठी थेट मदत मिळणार आहे.

Leave a Comment