महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आल्यानंतर लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न बहुतांश राजकारणी नेत्यांनी व नागरिकांनी विचारला ! यामुळे महाराष्ट्र राज्यात लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दिनांक 9 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या युवकांना लाडका भाऊ योजनेचा लाभ देण्यात येईल ? यासाठी आवश्यक पात्रता काय असेल ? कागदपत्र कोणती लागतील ? ऑनलाइन अर्ज कसा करावा ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
लाडका भाऊ योजना काय आहे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूरमध्ये बोलतांना राज्यातील तरुणांसाठीच्या महत्वकांक्षी लाडका भाऊ योजना किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बद्दलची माहिती दिली. या योजनेअंतर्गत तरुण युवकांना प्रशिक्षणा दरम्यान दरमहा मानधन (Stipend) दिलं जाणार आहे. ज्यामध्ये 12 वी उत्तीर्ण तरुणांना 6 हजार रु. दरमहा, डिप्लोमा उत्तीर्ण तरुणांना 8 हजार रु. दरमहा आणि पदवीधर उत्तीर्ण तरुणांना 10 हजार रु. दरमहा दिले जाणार आहेत.
संबंधित योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात, कंपनीत ॲप्रेंटशीप करत असेल तर त्यांना दरमहा शासनाकडून निश्चित स्टायफंड दिला जाणार आहे. यासाठी सरकारकडून पैसे भरण्यात येणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारकडून अशा प्रकारची योजना घोषित केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आवश्यक कागदपत्रे (Documents)
- रहिवाशी दाखला
- शैक्षणिक कागदपत्र
- मार्कमेमो
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ई-मेल आयडी
- आधार कार्ड
- एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नोंदणी
- प्रशिक्षण पुरावा
लाडका भाऊ पात्रता काय ?
राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेलाच “लाडका भाऊ योजना” असं म्हटल जात आहे. या योजनेसाठी शासनाकडून काही महत्त्वाच्या अटी व नियम ठेवण्यात आलेल्या आहेत. खालीलप्रमाणे जो युवक पात्र असेल, त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
- ही योजना फक्त महाराष्ट्रातील तरुणांसाठी असेल.
- लाभार्थी तरुणांचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे.
- शैक्षणिक पात्रता 12वी, डिप्लोमा, पदवी असणे आवश्यक.
- शिक्षण सुरू असल्यास तरुणांना लाभ दिला जाणार नाही.
- बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- कंपनी, महामंडळ किंवा कारखान्यात अप्रेंटीशीप करत असलेल्या तरुणानाच लाभ देण्यात येईल.
- इच्छुक उमेदवारांनी Mahaswayam या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
पात्र लाभार्थी युवकांना खालीलप्रमाणे राज्य शासनाच्या रोजगार महास्वयम या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल :- येथे क्लिक करा
- वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी नोंदणी करा असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करावी.
- नोंदणी करताना संपूर्ण नाव, आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक ती माहिती भरावी.
- आवश्यक माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर बरोबर असल्याची खात्री करून नेक्स्ट या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवण्यात येईल, तो ओटीपी टाकून ओके या बटणावर क्लिक करावे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती सविस्तर व योग्यरीत्या भरावयाची आहे.
- अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या रोजगार महास्वयम या पोर्टलवर नोंदणी करून लाडका भाऊ योजना किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळवू शकता.
| शासन निर्णय (GR) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन नोंदणी | येथे क्लिक करा |
📢 ही माहिती पण नक्की वाचा ⬇️
