Kotak Junior Scholarship : महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. आता महाराष्ट्र शासनासोबत विविध बँकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी स्कॉलरशिप सुरू करण्यात आलेल्या आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गरजू व त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी; म्हणून कोटक महिंद्रा बँकेकडून कोटक जूनियर स्कॉलरशिप सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण संबंधित लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Kotak Bank Scholarship
नामांकित कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर फंडामधून कोटक महिंद्रा बँक कोटक ज्युनियर स्कॉलरशिप प्रोग्रामअंतर्गत राज्यातील दहावी उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दरमहिना 3500 रु. इतकी रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांची एसएससी, सीबीएससी किंवा आयसीएससी बोर्डातून दहावी झालेली असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना कोटक ज्युनिअर स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे. ज्यांतर्गत विद्यार्थ्यांना दरमहिना 3500 रुपये पुढील शिक्षणासाठी म्हणजेच अकरावी व बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी दिले जाणार आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांना 21 महिन्यासाठी एकूण 73500 रु. कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर फंडामधून देण्यात येतील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2024 देण्यात आली आहे.
स्कॉलरशिपसाठी अटी व पात्रता
- विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला दहावीमध्ये कमीत कमी 85 टक्केवारी असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची दहावी 2024 मध्ये झालेली असावी.
- विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने अकरावीमध्ये कोणत्याही विद्यालयात आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स या शाखेसाठी प्रवेश घेतलेला असावा.
- कुटुंबाचे एकूण उत्पन्न तीन लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी हा मुंबई मेट्रोपोलेशन रिझनमधील (MMR) असणे आवश्यक आहे.
- कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि बडी फॉर स्टडी यांच्या पाल्यांसाठी ही योजना लागू नाही.
या स्कॉलरशिपचे फायदे
विद्यार्थ्यांना अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी कोटक महिंद्रा बँकेकडून दर महिना 3500 रु. असे एकूण 73500 रु. देण्यात येतील. यामुळे शैक्षणिक कर्जाचा अतिरिक्त भार पालकावर परिणाम नाही. विद्यार्थ्यांना संबंधित स्कॉलरशिपची रक्कम दर तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी देण्यात येईल. याचा वापर त्यांना ट्युशन फीस, बुक स्टेशनरी, ट्रॅव्हल्स आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी करता येईल.
आवश्यक कागदपत्रे
- SSC/ISCE/CBSE मार्कशीट
- पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डचे पुढील व मागील पानाचे झेरॉक्स
- चालूमधील पासपोर्ट आकाराचा फोटो
- विद्यार्थी व पालक यांचा आधारकार्ड
- वडिलांचा पॅन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- मृत्यू प्रमाणपत्र (एकल पालक असल्यास)
- विद्यार्थ्यांचा बँक पासबुक झेरॉक्स
आँनलाईन अर्ज कसा करावा ?
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जावे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर कोटक जुनियर स्कॉलरशिप 2024-25 अश्याप्रकारे स्क्रीनवर तुम्हाला माहिती दिसेल.
- अर्जाच्या सर्वात शेवटी किंवा वरच्या बाजूस तुम्हाला Apply Now हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- Apply Now या पर्यायावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती विचारली जाईल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक असल्यास संपूर्ण कागदपत्र योग्य त्या फॉरमॅटमध्ये अपलोड करून अटी व शर्ती मान्य करून तुमचा अंतिम अर्ज दाखल करा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
