कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच अर्थसहाय्य स्टेट्स ऑनलाईन चेक करा ! Beneficiary Status

Beneficiary Status : आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

सोयाबीन कापूस अनुदान ऑनलाईन स्टेटस

शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

ऑनलाईन स्टेटस असा बघा !

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

  • सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर खालीलप्रमाणे “Disbursement Status” या पर्यायावर क्लिक करा.

  • पुढे Disbursement Status पेज उघडल्यानंतर त्यामध्ये खालीलप्रमाणे आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमच्यासमोर काहीच वेळात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याच्या स्टेट्सची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल.

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाच्या दि. ११ जुलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी अनुदान शासन निर्णय व फॉर्म नमुनायेथे क्लिक करा

Leave a Comment