कन्यादान अनुदान योजना महाराष्ट्र नवीन शासन निर्णय आला ! आता मिळणार 25 हजार रुपये

महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. अशीच एक योजना नवविवाहित जोडप्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येते. त्या योजनेचे नाव महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना असं आहे. ज्याअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना नवीन संसार सुरू करण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा नवीन जीआर नुकता शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला असून यामध्ये अनुदानात वाढ करण्यात आली आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण सदर लेखात पाहणार आहोत.

कन्यादान अनुदान योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना अंतर्गत आता नवविवाहित जोडप्यांना एकूण 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) राज्य शासनाकडून 18 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. नवविवाहित जोडप्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कन्यादान अनुदान योजना सुरू करण्यात आली.

संबंधित योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येत असून विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित जोडप्यांना त्यांचा नवीन संसार सुखाने सुरू करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात आर्थिक मदत करण्यात येते.

लाभार्थी कोण असणार ?

महाराष्ट्र कन्यादान योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित जोडप्यांना घेता येईल. या संदर्भातील अधिक पात्रता, अटी व शर्तीसाठी शासन निर्णय क्रमांक सावियो -२०१८/प्र.क्र.११०/अर्थसं दिनांक ०२.०२.२०१९ आणि शासन शुधिपत्रक क्रमांक सावियो -२०१८/प्र.क्र.११०/अर्थसं दिनांक ०४.०५.२०१९ पहावा.

अनुदानात वाढ – शासन निर्णय

यापूर्वी शासनाच्या या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना एकूण 20,000 रुपये व विवाह आयोजित करणाऱ्या संस्था किंवा मंडळांना प्रती जोडी 4,000 रुपये अनुदान देण्यात येत होते; परंतु अनुदानात वाढ करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 मे 2023 रोजी घोषणा केली होती. त्याअनुषंगाने अनुदानात वाढ देण्याचा अधिकृत शासन निर्णय दिनांक 18 जुलै 2024 रोजी शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे.

📢 लाडकी बहीण योजना १ला हफ्ता कधी मिळणार ? येथे क्लिक करा

अनुदानाची रक्कम वधूचे वडील आई किंवा पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशाद्वारे देण्यात येत असत; परंतु आता यामध्ये बदल करून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात यावी अशी तरतूद सुद्धा या शासन निर्णय द्वारे करण्यात आले आहे. संबंधित शासन निर्णयाचा जीआर डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जीआर डाऊनलोड करून संपूर्ण माहिती वाचू शकता.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Leave a Comment