आपल्या राज्यात शिधा व्यवस्थापन प्रणालीमध्ये सध्या ७००.१६ लाख रेशनकार्ड धारकांची क्षमता आहे. ही मर्यादा जवळपास पूर्ण झाल्यामुळे, आता नवीन लाभार्थ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करणे तितकंसं शक्य राहिलेलं नाही.
अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम
म्हणूनच, शासनाने एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे. अपात्र, दुबार नावाने कार्ड घेतलेले, स्थलांतरित झालेले किंवा मृत लाभार्थी यांची शिधापत्रिकांमधून छाननी करून वगळण्यासाठी ही “अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम” सुरु करण्यात आली आहे.
ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. या मोहिमेमध्ये अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) वर्गातील शिधापत्रिका धारकांची बारकाईने तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेमध्ये एक अर्ज सादर करावा लागणार असून, त्यामध्ये संबंधित लाभार्थ्यांची माहिती नीट भरावी लागेल. त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्रं जोडावी लागतील
जोडावी लागणारी कागदपत्रे
अपात्र शिधापत्रिका मोहिमेअतर्गत आपली पात्रता दर्शवण्यासाठी राशन कार्डधारक नागरिकांना खालीलप्रमाणे आवश्यक ती कागदपत्र सादर करावी लागतील.
- वीज बिल.
- टेलीफोन किंवा मोबाईलबिल
- वाहनचालक परवाना
- मतदार ओळखपत्र
- बँक पासबुक
- LPG जोडणी क्रमांक
- आधार कार्ड
- भाडेपावती
- निवासस्थानकाच्या मालकी बद्दलचा पुरावा
तपासणीसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही
महाराष्ट्र शासनामार्फत गावोगावी सुरू करण्यात आलेल्या अपात्र शिधापत्रिका तपासणीसाठी गावातील रेशन दुकानदार किंवा संबंधित कर्मचारी यांच्याकडून घरोघरी जाऊन संबंधित गावातील रेशन कार्डधारक लाभार्थ्यांची माहिती अर्जामध्ये भरून घेतली जाणार आहे.
या अर्जासाठी नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही, अशा प्रकारचा शासन निर्णय म्हणजेच जीआर सुद्धा शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे.
शिधापत्रिका तपासणी अर्ज भरून घेत असताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या पैशाची मागणी एखादा अधिकारी करत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार ऑनलाइन करू शकता. तक्रार करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शिधापत्रिका तपासणी अर्ज
शिधापत्रिका तपासणीचा अर्ज, जर तुम्हाला PDF स्वरूपात डाउनलोड करायचा असेल, तर अर्जाच्या शेवटी देण्यात आलेल्या बटनावर क्लिक करा.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून शिधापत्रिका तपासणी अर्जाचा नमुना तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर सहज डाउनलोड करू शकता. या अर्जामध्ये अर्ज कसा भरावा ? कोणते कागदपत्रे लागतात आणि प्रक्रिया काय आहे – हे सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे अर्ज करताना गोंधळ होणार नाही.
