रेशन कार्डला नवीन मोबाईल क्रमांक कसा लिंक करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Link Mobile Number To Ration Card : आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडे रेशन कार्ड उपलब्ध आहेत. ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका असेल, अशा नागरिकांनाच शासनाकडून रेशन धान्य दिलं जातं. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि अद्याप तुम्ही तुमच्या रेशन काढला मोबाईल क्रमांक लिंक केलेला नसेल, किंवा तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेतला असेल, तर तो अपडेट कसा करायचा ? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

रेशन कार्डला मोबाईल क्रमांक असा लिंक करा

तुम्ही जर काही कारणास्तव तुमचा मोबाईल क्रमांक बदललेला असेल आणि तुम्हाला नवीन नंबर रेशन कार्ड मध्ये अपडेट करावयाचा असेल, तर तुम्ही कसा करू शकता याबद्दल आज तुम्हाला माहिती मिळणार आहे. रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर तुम्ही घरबसल्या अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला कोठेही जायची आवश्यकता नाही. फक्त खालीलप्रमाणे काही स्टेप्स फॉलो करून सहज आणि सोप्या पद्धतीने रेशन कार्डला तुम्हाला मोबाईल क्रमांक लिंक करता येईल.

रेशन कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी तुमच्याकडे NFS ID, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बारा अंकी रेशन कार्ड क्रमांक इत्यादी विविध बाबींची आवश्यकता लागेल. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर संबंधित माहिती ऑनलाईन भरावी लागेल, त्यानंतर मोबाईलवरती ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमचा नवीन मोबाईल क्रमांक रेशन कार्डला लिंक होईल.

  • सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
  • वेबसाईटवर आल्यानंतर ‘Citizen’s Corner’ या नावाचा सेक्शन दिसेल, त्या ठिकाणी ‘Register/Change of Mobile No’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
  • आता तुमच्या कुटुंबातील मुख्य सदस्यांचा एनएफएस आयडी त्याठिकाणी टाका. एनएफएस आयडी नसेल तर तुमचा आधार क्रमांक टाकू शकता.
  • त्यानंतर तुमचा 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक टाकून घ्या.
  • रेशन कार्डवर घरातील ज्या मुख्य सदस्यांचे नाव लिहिलेले असेल, तेच नाव त्याठिकाणी लिहा.
  • आता शेवटची व सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मोबाईल क्रमांक, वरील सर्व स्टेट पूर्ण केल्यानंतर तुमचा नवीन मोबाईल क्रमांक तेथे टाकून ‘Save’ या पर्यायावर क्लिक करा.

ऑफलाईन मोबाईल क्रमांक कसा अपडेट करावा ?

जर तुम्हाला नवीन मोबाईल क्रमांक रेशन कार्डला लिंक करताना किंवा अपडेट करताना काही अडचण येत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी ऑफलाइन अर्ज सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला फूड डिपार्टमेंटमध्ये (तहसील कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात) जाऊन तुमचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागेल. अर्ज सादर करत असताना अर्ज सोबत रेशन कार्ड, आधार कार्ड यांच्या प्रति द्याव्या लागतील. अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसात तुमचा मोबाईल क्रमांक रेशन कार्डसोबत अपडेट केला जाईल.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Leave a Comment