मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर महिलांना १४ ऑगस्ट २०२४ पासून लाभ मिळण्यास सुरू पण झालं असून मात्र काही महिलांच्या बँकेला आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. अश्या परिस्थितीत महिलांनी काय करावे किंवा आपला आधार क्रमांक बँकेची लिंक कसा करावा ? याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.
आधार क्रमांक बँकेशी लिंक प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये वर्ग करण्यात आले असून अजूनही रोज अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत.
मात्र बँक खात्याशी आधार नंबर लिंक असेल तरच महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण 27 लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर घरबसल्या आधार क्रमांक बँक खात्याला कसे लिकं करायचे ? हे आपण जाणून घेणार आहोत.
सर्वांत अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेला बँक खाता क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही ? हे कसे तपासावे ते पाहुया. हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या https://uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
- त्यासाठी गुगलवरती सर्च करा My Adhar
- आता तुमच्यासमोर आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार नंबर टाकून लॉगिन करायचं आहे. त्यासाठी आधारकार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठविण्यात येईल, तो ओटीपी टाका.
- ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉगिन झाले आहात.
- आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला दिसेल.
- आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन दिसत असेल, त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाते ॲक्टिव आहे की नाही याची संपूर्ण माहिती समोर दिसेल.
आता बँक खात्याला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ते समजून घेऊयात ?
- सर्वात आधी तुम्हाला गुगल NPCI असं सर्च करायचं आहे.
- त्यानंतर खाली सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला NPCI चे अधिकृत संकेतस्थळ दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला consumer या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर Bharat Aadhar Seeding या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्यासमोर आणखी नविन पेज येईल. त्यावर आधार क्रमांक टाका. खाली Request for Aadhar ला Seeding या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे, त्या बँकेचं नाव निवडायचं आहे आणि खाली Fresh Seeding वर क्लिक करायचे आहे.
- बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे.
- टर्म्स अँड कंडिशन्सस वाचून त्यांचा स्वीकार करा आणि त्यानंतर कॅपचा कोड आला असेल, तो भरा आणि सबमिट करा.
| NPCI अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| आधारकार्ड लिंक स्टेटस | येथे क्लिक करा |
