मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात 1 जुलै २०२४ पासून लागू करण्यात आलेली आहे. संबंधित योजनेमध्ये पात्र महिलांना, मुलींना अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली असून संबंधित योजनेमध्ये काही निकष व अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. शासनाकडून नवीन शासन निर्णय काढून यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बदल वेळोवेळी केले जात आहेत. त्यामुळे बहुतांश अर्जदारांचा अर्ज चुकल्याची किंवा चुकीची कागदपत्र अपलोड केल्याची तक्रार समोर येत होती.
वरील सर्व बाबींचा विचार करता शासनाकडून आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एखाद्या अर्जदारांचा फॉर्म भरल्यानंतर चुकलेला असेल, तर त्यांना दुरुस्ती करण्यासाठी नवीन पर्याय किंवा Edit ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
त्यामुळे तुमचा अर्ज ऑनलाईन भरत असताना काही चुका झाल्या असतील, तर अजिबात घाबरू नका. तुमचा फॉर्म घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही दुरुस्त करू शकणार आहात. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण सदर लेखातून पाहणार आहोत.
How To Edit Majhi Ladki Bahin Yojana Form
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज करत असताना जर तुमच्या अर्जामध्ये नावात पत्त्यामध्ये जन्म तारखे मध्ये किंवा इतर माहिती मध्ये काही चूक झाली असेल आणि ती चूक तुम्हाला दुरुस्ती करायचे असल्यास आता शासनाकडून पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यासाठी नारी शक्ती दूत हा अँप्लिकेशन नुकताच प्ले-स्टोअरवर अपडेट करण्यात आलेला असून संबंधित अँप्लिकेशन तुम्ही खालील बटनावर क्लिक करून डाउनलोड करू शकता. अर्जामध्ये कशाप्रकारे बदल करावा ? याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला Play Store वरून नारी शक्ती दूत नावाचा ॲप अपडेट करावा लागेल किंवा तुम्ही पहिल्यांदा ॲप वापरत असल्यास इंस्टॉल करावा लागेल.
- पूर्वीचा ॲप असल्यास अपडेट या पर्यायावर क्लिक करून सर्वप्रथम ॲप Update करून घ्यावे.
- ॲप अपडेट झाल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप Open करावा.
- तुमच्यामार्फत करण्यात आलेल्या अर्जांची यादी तुम्हाला डॅशबोर्डला दिसेल.
- ज्या अर्जामध्ये तुम्हाला दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे. त्या अर्जावर क्लिक करून Edit हा पर्याय निवडावा.
- Edit हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही तुमचा चुकलेला फॉर्म दुरुस्त करू शकता.
- त्यानंतर संबंधित सर्व आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करावीत आणि संपूर्ण माहिती बरोबर असल्याची पडताळणी करावी. ज्याठिकाणी अर्जात चूक झाली असेल, त्याठिकाणी योग्य तो बदल करावा.
मित्रांनो, अश्याप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये घरबसल्या नारी दूत या मोबाईल ॲपच्या माध्यमातून बदल करू शकता. जर तुम्हाला स्वतःहून बदल करता येत नसेल, तर तुम्ही जवळील आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्रचालक किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडून मदत घेऊ शकता.
