महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 83 महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे ? हे आपण संबंधित लेखात जाणून घेणार आहोत.
लाडकी बहीण योजना यादी
आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या याद्या (Ladki Bahin Yojana Beneficiary List) अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील, तर त्या लवकरच दिसतील.
प्रत्येकाने आपल्या जिल्ह्या/महानगरपालिकेचे नाव गूगलमध्ये लिहायचं आहे. आपण या ठिकाणी धुळे जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गूगलमध्ये Dhule Municipal Corporation लिहीत आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या वेबसाईट ओपन करायची आहे.
१) आता तुम्हाला मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादीची (Ladki Bahin Yojana Beneficiary List) लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
२) पुढे विविध PDF फाईल वार्डनुसार याद्या अपलोड केलेल्या आहेत. Dowaload लिंकवर क्लिक करून PDF फाईल डाउनलोड करा.
३) आता लाभार्थी (Ladki Bahin Yojana Beneficiary List) यादी ओपन करून तुमचे नाव आहे का ते चेक करा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
जर ऑनलाईन यादी पाहता आली नाहीतर कुठे पाहाल यादी?
१) पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या गावात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी पाहता येणार आहे.
२) प्रत्येक गावात समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत.
३) त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचना दरम्यान हजर राहावे लागणार आहे.
४) ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल, तर तोही करावा लागणार आहे.
