रेशन कार्डची केवायसी करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. ज्या नागरिकांची रेशन कार्डची केवायसी पूर्ण होईल त्यांचे रेशन कार्ड चालू राहणार आहे; परंतु जे नागरिक आपल्या रेशन कार्डची केवायसी पूर्ण करणार नाहीत, अशा नागरिकांचे रेशन धान्य बंद होऊ शकते. तसेच रेशन कार्डच्या बाबत मिळणाऱ्या इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास देखील अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे रेशन कार्डची KYC करणे अत्यंत आवश्यक आहे.
आपली केवायसी पूर्ण झाले का कसे चेक करावे ?
- सर्वप्रथम प्ले-स्टोरवरून मेरा रेशन 2.0 हे ॲप डाऊनलोड करा.
- त्यामध्ये आपला कुटुंबप्रमुखाचे आधार कार्ड नंबर टाकून लॉगिन करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर मेरा रेशन ॲपमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध असेल.
- सर्वात वरती तुम्हाला तुमचे रेशन कार्ड दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे दिसतील.
- कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे केवायसी झाली आहे की नाही, त्याचे स्टेटस देखील दिसेल.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डच्या केवायसीचे स्टेटस चेक करू शकता.
याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन देखील तुमची केवायसी करून घेऊ शकता व तुमच्या केवायसीची स्टेटस देखील चेक करू शकता.