Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण असल्यामुळे कापूस व सोयाबीन या पिकांना योग्य तो भाव मिळाला नाही, सोबतच पिकांची उत्पादकता कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान पाहता, त्यांना मदत करावी या अनुषंगाने शासनाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण संबंधित लेखात पाहणार आहोत.
सोयाबीन-कापूस अनुदान
शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं, त्यामुळे सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून घेण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
संबंधित लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवर पिकांची नोंद केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे; कारण डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येणार आहेत. अनुदान मिळवण्याकरता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडे करावी लागणार आहे.
लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे
- आधार कार्ड (वैयक्तिक खातेदारांसाठी)
- संमती पत्र
- स्वयंसाक्षांकित आधार कार्ड (सामायिक खातेदारांसाठी)
- सामायिक खातेदारांसाठी ना हरकत प्रमाणपत्र
- सामायिक खातेदारांना संमती पत्र आवश्यक
- बँक पासबुक झेरॉक्स
- यादीतील अनुक्रमांक
वरील देण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्र पात्र शेतकऱ्यांना विहित मुदतीत आपल्या गावातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे जमा करावी लागतील.
याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
2023 या हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी पोर्टलवर किंवा ॲपच्या माध्यमातून केलेली असेल अशाच शेतकऱ्यांना संबंधित अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. सोबतच या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे, तरच त्यांना या अनुदानाचा लाभ देण्यात येईल.
यादीत नाव कसं पहावं ?
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिल जाणार आहे; परंतु बहुतांश शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की, संबंधित अनुदानाचा लाभ आम्हाला मिळेल का ? नाही याची यादी कुठे पाहण्यास भेटेल. पात्र शेतकऱ्यांची यादी ही तालुका कृषी कार्यालयास देण्यात आलेली आहे. सोबतच तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात ही यादी लावण्यात आलेली आहे. त्याठिकाणी तुम्ही तुमचं यादीत नाव असल्याची खात्री करून घेऊ शकता.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
📢 हे पण वाचा….👇
| विकास महामंडळ कर्ज योजना | येथे क्लिक करा |
| शेतकरी कर्जमाफी होणार ? | येथे क्लिक करा |
| महिलांना ३ सिलेंडर मोफत | येथे क्लिक करा |
| शेती नकाशा मोबाइलवर पहा ! | येथे क्लिक करा |
