Crop Compensation : २०२३-२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने ४४५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, यातील २४५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आधीच जमा करण्यात आले आहेत.
उर्वरित रक्कमही येत्या २-३ दिवसांत DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली आहे. या मदतीमुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा नक्कीच मिळणार आहे.
NDRF निकषानुसार मदत मिळणार
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाल्यानंतर आणि संबंधित अहवाल प्राप्त झाल्यावर सरकारकडून मदतीचे वितरण केले जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर, लोणार, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांत ६५ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाल्याने सुमारे ५०,३९७ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मूग, भाजीपाला अशा महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या नुकसानग्रस्त भागांमध्ये शेती आणि घरांचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले असून, संबंधित अहवाल मिळताच केंद्र सरकारच्या एनडीआरएफ निकषानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली आहे.
| लाडकी बहीण कर्ज योजना | येथे क्लिक करा |
| महिलांना दरमहा 7,000 रुपये | येथे क्लिक करा |
| बीज भांडवल कर्ज योजना | येथे क्लिक करा |
