Crop Insurance : मोठ्या पावसानं पिकाचं नुकसान झालं असल्यास विमा कंपनीकडे अशी ऑनलाईन तक्रार नोंदवा !

Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकरी यांचे सततच्या पावसामुळे शेतात पाणी थांबून किंवा इतर अन्य कारणामुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळवणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्यास्थितीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करून विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार नोंदवावी.

कृषी रक्षक हेल्पलाईन क्रमांक

तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध पद्धती कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यापैकीच एक महत्त्वाची पद्धत म्हणजे हेल्पलाइन क्रमांक होय. तक्रार करण्यासाठी संबंधित विभागाकडून टोल फ्री क्रमांक 14447 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या क्रमांकावर शेतकरी कॉल करून आपल्या झालेल्या एक नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात.

शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास अशिक्षित शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने पिकाची तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे पाच टप्प्यात तुम्ही पाहू शकता.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️

ऑनलाईन तक्रार कशी करावी ?

तुमच्या पिकांचं नुकसान झाल्याची तक्रार तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदवायची असल्यास Crop Insurance या ॲपची मदत घ्यावी लागेल. नुकसान भरपाई चे सूचना दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर पावती स्वरूपात डॉकेट क्रमांक मिळतो. ॲप डाऊनलोड करून तक्रार नोंदविण्याकरिता खालील प्रक्रिया पहा.

स्टेप 1 : सर्वप्रथम प्ले-स्टोअरवरून Crop Insurance नावाचा ॲप इंस्टॉल करा, त्यानंतर ॲप उघडा.

स्टेप 2 : ॲप उघडल्यानंतर Continue as Guest हात पर्याय निवडा.

स्टेप 3 : त्यानंतर Crop Loss / पीक नुकसान हा पर्याय निवडा.

स्टेप 4 : त्यानंतर Crop Loss Intimation / पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडा.

स्टेप 5 : त्यानंतर तुमचा कार्यरत असलेला मोबाईल क्रमांक टाका.

स्टेप 6 : तुमच्या मोबाईलवरती ओटीपी पाठविण्यात येईल, काळजीपूर्वक योग्य ती ओटीपी टाकून अर्ज सादर करा.

स्टेप 7 : त्यानंतर पुढील टप्प्यात हंगाम-खरीप, वर्ष-2024 योजना आणि राज्य निवडा.

स्टेप 8 : नोंदणीचा स्त्रोत CSC निवडा आणि तुमच्याकडे देण्यात आलेल्या पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक आहे का ? या पर्याय समोरील बटन वर क्लिक करा आणि तुमचा विमा पावती क्रमांक टाका.

स्टेप 9 : पुढे पावती क्रमांक टाकल्यानंतर पावती क्रमांकवरती टिक करा. तुमच्या पॉलिसी क्रमांकाचा तपशील दिसेल.

स्टेप 10 : ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार तुम्हाला करावयाची असेल किंवा ज्या पिकाची तक्रार तुम्हाला करावयाची असेल, तो अर्ज निवडा प्रत्येक पिकाकरिता किंवा गटाकरिता तुम्हाला स्वातंत्र्य तक्रार करता येईल.

स्टेप 11 : त्यानंतर घटनेचा प्रकार पुढीलप्रमाणे टाका – Excess Rainfall किंवा Inubdation निवडा, घटनेचा दिनांक – ज्या दिवशी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असेल ती तारीख टाका. पीक वाढीचा टप्पा – Standing Crop आणि त्यानंतर नुकसान टक्केवारी टाका.

स्टेप 12 : संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुमच्या नुकसान झालेल्या पिकांचा फोटो काढा आणि Submit/सादर करा हा पर्याय निवडा.

स्टेप 13 : तुम्ही तुमचा अर्ज योग्य पद्धतीने अंतिम सादर केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तक्रारी यशस्वीरित्या नोंद झाल्यासंदर्भात एक Docket Id प्राप्त होईल, तो Docket Id जतन करून ठेवा.

तर अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पिकाचं नुकसान झाल्यास पिक विमा मिळवण्यासाठी पीक नुकसान भरपाईची तक्रार किंवा Claim नोंद करू शकता.

नवीन पीककर्ज दर्ज जाहीरयेथे क्लिक करा
नुकसान भरपाई कशी ?येथे क्लिक करा
पीकविमा यादी कशी बघावी ?येथे क्लिक करा
जमीन मोजणी कशी करावी ?येथे क्लिक करा

Leave a Comment