Mahadbt Subsidy Scheme : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कापूस साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ८ बॅग देण्यात येणार आहेत. या बॅगसाठी अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस उत्पादन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज कोठे व कसा करावा ? याची संपूर्ण माहिती याठिकाणी आपण पाहणार आहोत.
कापूस साठवणूक बॅग अनुदान
राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे याच या अंतर्गत ही एक योजना आहे २०२२ ते २०२५ च्या आर्थिक वर्षामध्ये ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे यासाठी एकूण खर्च १००० कोटी रुपये तरतूद करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला १ एकरसाठी ३ बॅग २ एकरसाठी ६ बॅग आणि १ हेक्टरसाठी जास्तीत जास्त ८ बॅग शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेतकऱ्यांना शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ देण्यात आली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ३१ ऑगस्टच्या पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
कापूस उत्पादकता आणि विशेष मूल्य साखळी योजना ही फक्त कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये राबविली जाते. तिथल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचा तालुका हा कापूस उत्पादक तालुक्यामध्ये असेल, तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज कसा करावा ? याची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
1. सर्वप्रथम महाडीबीटी शेतकरी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करा त्यानंतर लॉगिन करा.
2. रजिस्ट्रेशन करताना टाकलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
3. बियाणे, औषधे व खाते विभाग निवडा : त्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. बियाणे, औषधे व खते या विभागातील साठवणूक सुविधा पर्याय निवडा.
4. पीक निवडा : कापूस या पिकाचा पर्याय निवडा. अनुदानासाठी कापूस साठवणूक बॅग पर्याय निवडा.
5. माहिती भरा : लाभार्थ्याचा तालुका, गाव, गट क्रमांक यासंबंधी माहिती भरा. एकूण क्षेत्र (हेक्टर आणि आर मध्ये) भरा.
6. अर्ज जतन करा : आवश्यक सर्व माहिती भरून जतन करा या बटनावर क्लिक करा.
7. प्राधान्यक्रम द्या : अर्ज भरल्यानंतर, मुखपृष्ठावर जाऊन अर्ज सदर करा या बटनावर क्लिक करा आणि प्राधान्य क्रम द्या.
त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून तुमच्या अर्जाची प्रत काढून घ्या. तुमची निवड झाल्यानंतर कृषी सहायक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडून पुढील कार्यवाही करून तुम्हाला अनुदान देण्यात येईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- शेतजमिनीचा 7/12 उतारा
- जमिनीचा 8 अ उतारा
- बँक पासबुक झेरॉक्स
- जातीचा दाखला ( आवश्यक असल्यास)
- शेतकरी हमीपत्र
योजना कोणासाठी आहे ?
ही योजना फक्त कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये राबवली जाते. तिथल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचा तालुका कापूस उत्पादक तालुक्यात मोडत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
