Crop Insurance Date Extended : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी अर्ज काही दिवसापासून सुरू करण्यात आले होते; पीक विमा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना अंतिम मुदत ही 15 जुलै 2024 देण्यात आली होती; परंतु काही शेतकऱ्यांना तांत्रिक व इतर कारणास्तव पीक विमा भरता आला नाही. याचा विचार करता संबंधित विभागाकडून पीक विमा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आता या तारखेपर्यंत विमा भरता येणार आहे.
पीक विमा योजना मुदतवाढ
राज्यात पीक विमा भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे ऑनलाईन पीक विमा भरत असताना कागदपत्र अपलोड करण्यासाठी, भूमी अभिलेख पोर्टल शेतकऱ्यांची माहिती समक्रमित (Sync) करण्यासाठी वेळ लागत आहे. परिणामी काही शेतकरी पात्र असूनसुध्दा अश्या अडचणीमुळे पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
यासोबतच सध्या शेतकऱ्याची शेतीकडील विविध मशागतीची कामे रखडलेली असल्यामुळे काही शेतकऱ्यांना विहित मुदतीत पीक विमा भरता येणार नाही. विमा भरल्यास शेतकऱ्यांना सबंधित विमा कंपन्यांकडून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते. या सर्व बाबींचा विचार करता आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही; कारण आता खरीप हंगामातील पीक विमा ऑनलाईन भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै 2024 ही शेवटची दिनांक देण्यात आली आहे.
📢 लाडकी बहिण योजना ५ महत्वपूर्ण बद्दल शासन निर्णय आला !
बहुतांशी शेतकऱ्यांकडून खरीप पिक विमा भरण्यासाठी वाढीव मधून देण्यात यावी, अशी मागणी केल्यानंतर आणि संबंधित विभागाला निवेदन पत्र दिल्यानंतर पिक विमा भरण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ म्हणजेच 15 जुलै 2024 पासून 31 जुलै 2024 अशी करण्यात आलेली आहे. अद्याप ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला नसेल, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाचा हा निर्णय खूपच दिलासादायक ठरणार. त्यामुळे ज्या शेतकऱ्यानी पिक विमा भरलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर आपल्या विमा भरून घ्यावा.
