ladaki Bahin Yojna GR : महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहिण योजना खूपच कमी काळात प्रचलित आणि प्रसिद्ध झाली आहे. महिलांच्या अडचणी लक्ष्यात घेता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वेळोवेळी महत्वपूर्ण बद्दल करण्यात येत आहेत.
लाडकी बहीण योजनेत आणखी अश्याच 5 प्रकारचे आवश्यक मोठे बदल करण्यात आले आहेत. ‘या’ महिलांसाठी आता आनंदाची बातमी ! जाणून घ्या काय बदल शासनाकडून करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये महिलांना फॉर्म भरताना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते, याचा विचार करून हे बद्दल करण्यात आले आहेत.
त्यामुळे आता सरकारकडून पुन्हा नवीन जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. सरकारने जारी केलेला नवीन शासन निर्णय काय आहे व यामध्ये कुठले पाच महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहुयात. शासन निर्णय (GR) तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
5 मोठे बद्दल खालीलप्रमाणे 👇
- कुटुंबाची व्याख्या : पती-पत्नी किंवा त्यांची अविवाहित मुले-मुली अशी कुटुंबाची व्याख्या आता संबंधित योजेनेमध्ये ग्राह्य धरली जाणार आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेसाठी इंडिया पोस्टमधील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल.
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज केल्यास महिलेने सादर केलेल्या फोटोचा फोटो काढून अर्ज दाखल करण्यात येईल.
- नवविवाहित महिलांच नाव जर रेशन कार्डवरती नसेल, तर त्या महिलेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल.
- केंद्र आणि राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सदर योजनेचा लाभ दिला जाईल.
- त्यामध्ये शासन निर्णय अनुसार काही अटी व शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत.
अशाप्रकारे शासनाद्वारे (ladki Bahin Yojna 2024) वरील पाच नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णयसुध्दा 12 जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. वरील केलेल्या बदलामुळे आता महिलांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत ज्या महिलांना या विषयी माहिती नसेल, त्या सर्व महिलांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.
