मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल होणाऱ्या बदलासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे.
राज्यात नुकताच महायुतीच सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारमध्ये राज्याचा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. दरम्यान, निवडणुकीत महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ 2100 रुपये पर्यंत वाढविण्यात येईल अस आश्वासन दिलं होतं.
2100 रु. कधी मिळणार ?
महिलांना आता 2100 रुपये नेमके कधी मिळणार ? असे लाभार्थी महिलांकडून वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे. आगामी अर्थसंकल्पात आम्ही त्यावर विचार करू, असं स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार ?
असे विचारण्यात आल्यानंतर यावर बोलताना “सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत, तसेच महिलांना मिळणारा लाभ 2100 रुपये करण्यात येणार आहे.” आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्यप्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
अर्जाची छाननी होणार !
ज्या महिलांना निकषाच्या आत लाभ मिळत असेल, त्यांना यापुढे सुद्धा लाभ मिळतच राहील; परंतु काही महिलांना निकषाच्या बाहेर राहून लाभ मिळत आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत. यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न मर्यादा, चार चाकी वाहन नोंद, डबल डोर फ्रीज, वॉशिंग मशीन, स्पोर्ट्स बाईक इत्यादी बाबी फेरपडताळणी करताना आढळून आल्यास अश्या महिलांना अपात्र ठरविण्यात येईल.

दरम्यान, फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आगामी अर्थसंकल्पानंतरच वाढीव पैशांचा लाभ मिळणार आहे, हे फडणवीस यांच्या माहितीनंतर स्पष्ट झाले आहे. तसेच निकषाच्या बाहेर असलेल्या महिलांची नावेही रद्द केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या योजनेसंदर्भात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📢 ही माहिती पण वाचा :
| 2100 रु . कधी मिळणार ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण 5 मोठे बद्दल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण फॉर्म चुकला | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण हफ्ता कधी ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण नवीन वेबसाईट | येथे क्लिक करा |
| कोणत्या खात्यात पैसे येणार ? | येथे क्लिक करा |
