लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल होणार ! वेबसाईटवर अलर्ट जारी, लगेच बघा तुम्हाला पण अलर्ट आला आहे का ?

नमस्कार, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतेही व्यक्ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वसूल करण्यात येणार आहेत, एक महत्त्वाची अशी अपडेट राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण संबंधित लेखांमध्ये पाहणार आहोत. नक्की कोणत्या महिलांचे पैसे वसूल होणार ? कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळत राहणार आहे ?

लाडकी बहीण योजना नवीन अपडेट

राज्य शासनाकडून महिलांना आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा राज्यातील जवळपास 2 कोटी महिलांनी लाभ घेतला असून आता या योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. अपात्र महिलांना पोर्टलवर त्या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आलेला असून संबंधित अपात्र महिलेकडून देण्यात आलेले पैसे वसूल करण्यात येणार आहेत.

जर तुमच्या नावापुढे पण अलर्ट आला असेल, तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत. सोबतच यापूर्वी जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते आलेले असतील, तर शासनाकडून ते सुद्धा वसूल केले जाऊ शकतात.

कोणत्या महिला ठरणार अपात्र

ज्या महिलांनी आपली वय आधार कार्डवर वाढवून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि सोबतच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील. अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहेत. म्हणजेच अशा सर्व महिलांचा पुढील येणारा हप्ता शासनाकडून थांबविण्यात येईल.

वेबसाईटवर काय अलर्ट आला ?

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आता नवीन दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक ऑप्शन आज संजय गांधी निराधार योजना संदर्भात आहे, तर दुसरा ऑप्शन महिलांच्या नावापुढे YES असा आलेला आहे. तर अशा महिलांना योजनेचा लाभ आता यापुढे तिला जाणार नाही.

सोबत जर तुमच्या NO असं येत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेत नाहीत, त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे सुद्धा येत राहतील. फक्त ज्यांच्या नावापुढे YES हा ऑप्शन आलेला आहे, त्याच महिलांना या योजनेतून अपात ठरविण्यात येईल व संबंधित महिलांना पुढील हप्ता देण्यात येणार नाही. यापूर्वी देण्यात आलेल्या हप्ते सुद्धा अशा महिलांकडून वसूल केले जाऊ शकतात.

दुसऱ्या ऑप्शनमध्ये आतापर्यंत महिलांना किती पैसे पडले आहेत, याची Transaction Details दिली गेली आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले, याची माहिती या ऑप्शनच्या माध्यमातुन तुम्ही पाहू शकता.

📜 हे सुध्दा वाचा :

लाडकी बहीण लाभार्थी यादीयेथे क्लिक करा
लाडकी बहीण 5 मोठे बद्दलयेथे क्लिक करा
लाडकी बहीण फॉर्म चुकलायेथे क्लिक करा
लाडकी बहीण हफ्ता कधी ?येथे क्लिक करा
लाडकी बहीण नवीन वेबसाईटयेथे क्लिक करा
कोणत्या खात्यात पैसे येणार ?येथे क्लिक करा

Leave a Comment