Ration Card KYC : तुम्ही शिधापत्रिकाधारक म्हणजेच रेशन कार्डधारक असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यापूर्वी रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी रेशन कार्डधारक नागरिकांना 31 ऑक्टोबर 2024 ही शेवटची मुदत देण्यात आली होती; परंतु आता यामध्ये सुधारणा करून नवीन मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
Ration Card KYC Last Date
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी आता नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. या नवीन तारखेपूर्वी रेशन कार्डची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. रेशन कार्डमध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांची केवायसी करणे बंधनकारक असेल. कुटुंबातील ज्या सदस्यांनी केवायसी केली नसेल, त्यांना रेशन दिलं जाणार नाही.
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता 01 डिसेंबर 2024 पूर्वी सर्व नागरिकांना आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. केवायसी न केलेल्या नागरिकांचे राशन धान्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी त्वरित आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी.
रेशनला आधार लिंक नसेल तर बोगस Ration Card बाद होणार
सार्वजनिक वितरण प्रणाली मधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून नवीन पाऊल उचलण्यात आलेला आहे. ज्याअंतर्गत आता कुटुंबातील पात्र सदस्यांची आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बोगस रेशन कार्ड समोर आल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे संबंधित विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेकांना आता रेशन काढला आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या असून ज्या नागरिकांनी केवायसी किंवा रेशन कार्डला आधार लिंक केलेला नसेल, त्यांच्या रेशन धान्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येईल. त्यामुळे ज्या नागरिकांची केवायसी शिल्लक असेल, त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी केवायसी पूर्ण करून घ्यावी.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
