सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम शासनाकडून जमा केल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडलेले दिसतात. ज्या महिलांना अद्याप रक्कम मिळालेली नसेल, त्यांनी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. कारण या ठिकाणी आपण महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत त्या तुम्ही नीट समजून घ्या.
4500 रु. मिळाले नाहीत
ज्या महिलांच्या खात्यात अजून 4500 जमा झालेले नसतील, त्यांनी काळजीपूर्वक अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पहावी. म्हणजे अर्जात भरलेला बँकेचा तपशील पुन्हा एकदा चेक करावा. बँक तपशील योग्य रीतीने भरलेला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही याचे स्थिती तपासावी. त्यानंतर बँक खात्याशी आधार लिंक असल्याची खात्री करावी. बँक खात्याला आधार लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.
पैसे बँक खात्यात लवकर जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्या. जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण येणार नाही.
वरील सर्व गोष्टी बरोबर असतील, तरी तुम्हाला पैसे मिळाले नसतील. अशा परिस्थितीत तुम्ही हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : 181 (महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र) या क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवायची आहे त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील.
तसेच ज्या महिलांनी योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा खाते क्रमांक टाकलेला असेल, अशा संयुक्त (Joint Account) खातेधारकांनाही पैसे मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तिक खातं सुरू करावा लागणार आहे. त्याची माहिती अर्जात भरावी लागेल. पण यासाठी सुद्धा वैयक्तिक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.
तक्रार याठिकाणी करा
माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमची सर्व माहिती बरोबर असेल आणि तरीसुद्धा तुमच्या हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास काळजी करण्याची आवश्यकता नाही. यासाठी 181 या शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची तक्रार मोफत नोंदवू शकता. तक्रार नोंदविल्यानंतर पुढील काही दिवसात तुमच्या तक्रारीचे निवारण करून अर्जामध्ये त्रुटी नसल्यास तुमच्या लाभाची रक्कम बँक खात्यात वितरित करण्यात येईल.
या सोबतच महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तुम्हाला तक्रार नोंदविता येईल. ज्या महिलांना ऑनलाईन तक्रार नोंदविता येत नसेल त्यांना अंगणवाडी केंद्रात जाऊन ही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
📢 ही माहिती पण वाचा..
| लाडकी बहीण लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण 5 मोठे बद्दल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण फॉर्म चुकला | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण हफ्ता कधी ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण नवीन वेबसाईट | येथे क्लिक करा |
| कोणत्या खात्यात पैसे येणार ? | येथे क्लिक करा |
