दुग्धविकास प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गाय म्हशी वाटप करण्यासाठी शासनाकडून दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी मान्यता देण्यात आली होती. या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय 16 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला असून याअंतर्गत शेतकऱ्यांना गाय म्हशी गट वाटप केलं जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण संबंधित लेखांमध्ये पाहणार आहोत. या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्हाला जीआर खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गाय म्हशी वाटप नवीन योजना
विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यामध्ये सन 2024-25 ते 2026-27 या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे. तथापि, दोन वर्षानंतर प्रकल्पाच्या फलश्रुतीबाबत आढावा घेऊन सन 2026-27 मध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाचे स्तरावर निर्णय घेण्यात येतील. या शासन निर्णयाच्या माध्यमातून दुधाळ गाई व म्हशीचे वितरण करण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत 13400 इतक्या गायी व म्हशी वितरित करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना याबरोबरच अनुदानसुद्धा देण्यात येणार आहे. अनुदान स्वरूप लाभार्थ्याला 50% इतकं देण्यात येईल. या योजनेअंतर्गत एकूण पात्र लाभार्थ्यांना नऊ बाबींचा लाभ देण्यात येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे.
अटी आणि शर्ती कोणत्या ?
- एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रती दिन किमान 8 ते 10 लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली 1 गाय/म्हशीचे वाटप करण्यात येईल.
- वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांना Digital Tracking Cow Coller लावणे आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक राहील.
- वाटप करण्यात आलेली गाय/म्हैस 3 वर्षापर्यंत विकता येणार नाही.
- वाटप करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांचा 3 वर्षासाठी विमा उतरविणे बंधनकरण राहिलं.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
