Ladki Bahin Beneficiary Update : महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना 1500 रु दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना आता प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी मिळवून एकूण 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
17 ऑगस्टपर्यंत सन्मान निधी मिळणार
महाराष्ट्र शासनाकडून महिलांनी केलेल्या अर्जांची युद्धपातळीवर तपासणी केली जात आहे. महिलांच्या अर्जांची छननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही ? हे ठरवले जात आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या आणि पात्र असलेल्या अनेक महिलांच्या बँक खात्यात शासनाकडून 3000 रुपये टाकण्यात आले आहेत. अजूनही 17 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे.
ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मंजूर झालेला असेल, तर अशा सर्व महिलांना 17 ऑगस्ट 2024 पर्यंत 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात वितरित केले जाणार आहेत. ज्या महिलांचा अर्ज 14 ऑगस्टनंतर मंजूर होईल, अशा महिलांना पुढील टप्प्यात लाभ देण्यात येईल, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे. 14 ऑगस्टच्या रात्री साधारण 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले. म्हणजेच सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
आता 31 ऑगस्टनंतरही अर्ज करता येणार
या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणाऱ्या महिलांचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात होता. यावरच आता महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नाही. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. 31 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाईल, असे तटकरे यांनी 11 ऑगस्ट रोजीच स्पष्ट केलेले आहे.
📢 हे पण वाचा 👇
| लाडकी बहीण लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण 5 मोठे बद्दल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण फॉर्म चुकला | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण हफ्ता कधी ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण नवीन वेबसाईट | येथे क्लिक करा |
| कोणत्या खात्यात पैसे येणार ? | येथे क्लिक करा |
