मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पहिली लाभार्थी महिला ही मुंबईची महिला ठरली आहे. या महिलेने ‘टीव्ही 9 मराठी’ला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार सुध्दा मानले आहेत. महिलेच्या मुलानंदेखील प्रतिक्रिया दिली. “दोन महिने असंच सुरु होतं. फोटो अपलोड करताना प्रोब्लेम आला. हेही वाटलं की होईल की नाही. अखेर ते अप्रू झालं. आधी 9 तारखेला 1 रुपया आला. यानंतर आज 14 ऑगस्टला 3 हजार रुपये जमा झाले आहेत”, अशी माहिती लाभार्थी महिलेच्या मुलाने दिली.
येथे पहा पक्का पुरावा 👇
लाडक्या बहिणींनो खातं चेक करा
राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. तसेच, महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.
📢 लाडकी बहीण योजना पैसे कोणत्या बँक खात्यात आले ? कसं चेक करावं ? येथे क्लिक करून पहा !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दोन महिन्यांचे पैसे जमा होत आहेत. मुंबईतील एक महिला या लाडकी बहीण योजनेची पहिली लाभार्थी ठरली आहे.
मुंबईतील लाभार्थी महिलेने टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलाने आधी मोबाईलवर फॉर्म भरला. यानंतर मी पत्रावर सही केली. त्यानंतर मला एक रुपया आला. त्यानंतर मला डायरेक्ट पैसे आले. मी मुख्यमंत्र्यांची आभारी आहे. मला खूप आनंज वाटत आहे”, अशी प्रतिक्रिया मुंबईतील पहिल्या लाभार्थी महिलेने दिली.
या महिलेच्या मुलानेदेखील प्रतिक्रिया दिली. “दोन महिने असंच सुरु होतं. फोटो अपलोड करताना प्रोब्लेम आला. हेही वाटलं की होईल की नाही. अखेर ते अप्रू झालं. आधी 9 तारखेला 1 रुपया आला. यानंतर आज 14 ऑगस्टला 3 हजार रुपये जमा झाले आहेत”, अशी माहिती लाभार्थी महिलेच्या मुलाने दिली.
itar३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालणार३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहेमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १ कोटी ३५ लाभार्थ्यांची यादी तयार1 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना पहिला हफ्ता 17 ऑगस्टाला10 दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांनाही मिळणार हफ्तापात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत.
इतर महत्वाची माहिती
- ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालणार
- ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १ कोटी ३५ लाभार्थ्यांची यादी तयार
- 1 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना पहिला हफ्ता 17 ऑगस्टाला
- 10 दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांनाही मिळणार हफ्ता
- पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत.
- लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु.
- १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन.
📚 हे पण वाचा 👇
| लाडकी बहीण लाभार्थी यादी | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण 5 मोठे बद्दल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण फॉर्म चुकला | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण हफ्ता कधी ? | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण नवीन वेबसाईट | येथे क्लिक करा |
| कोणत्या खात्यात पैसे येणार ? | येथे क्लिक करा |
