Gas Cylinder : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. संबंधित महिलांना आता महायुती शासनाकडून आणखी एक नवीन आनंदाची बातमी देण्यात आली आहे. मात्र महिलांना शासनाकडून दरवर्षी तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला असून यासंदर्भातील संबंधित अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल.
मोफत सिलेंडर योजना महाराष्ट्र
महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली, सोबतच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यासाठी 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रु. देण्याची घोषणा करण्यात आली. अशातच आता महायुती शासनाकडून महिलांना आणखी एक मोठे गिफ्ट देण्यात आलं आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
या योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेनंतर शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्वला योजनेतील लाभार्थ्याबरोबर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.
५६ लाखाहून अधिक कुटुंबांना लाभ
अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची” घोषणा करण्यात आली होती. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करावयाच्या असल्यास त्यादृष्टीने त्यांना धूरमुक्त स्वयंपाकाचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा राज्यातील 56 लाखाहून अधिक कुटुंबांना होणार आहे. अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
केंद्र सरकार उज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना एका गॅस सिलेंडर मागे ३०० रुपये अनुदान देते. एका गॅस सिलेंडरची सरासरी किंमत 830 रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपयेप्रमाणे तीन सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांनाही सरसकट अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
