नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेची संपूर्ण राज्यात राज्यातील गावागावात मोठी चर्चा सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना अंमलबजावणी सुरू झालेली असून राज्यातील लाखो महिलांनी ऑनलाईन अर्जसुद्धा दाखल केलेले आहेत. विविध जिल्ह्यात ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ऑफलाईन अर्ज दाखल केला आहे.
लाडकी बहीण योजना पहिला हफ्ता कधी?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली. त्यासाठी शासनाकडून नारीशक्ती दूत ॲप विकसित करण्यात आला. बहुतांश महिलांना प्रश्न पडला होता की ? लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार ? तर महिलांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योजनेचा पहिला हप्ता महिला भगिनींच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्यकर्त्यांनी दिली आहे. यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अंतिम तारीख सांगितली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांना कधी दिला जाणार ? यावर चर्चा झाल्यानंतर 15 ऑगस्टची तारीख सांगितली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रक्षाबंधनाची भेट म्हणून लाडक्या बहिणींना योजनेतील पहिला हप्ता दिला जाईल, असे स्पष्ट सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना माहिती दिली की, माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिला भगिनींना लवकरच दिला जाईल. यासाठी आमचा प्रयत्न आहे की, 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने पहिला हप्ता जमा करण्यात येईल, त्यासाठी शासनाकडून निधी देण्यात येईल. 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील, त्या अर्जांची नोंद जुलै महिन्यातच आले असं समजून त्यांनाही पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देण्यात येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत प्रत्येक भगिनीच्या बँक खात्यात थेट 3000 रु. जमा करण्यात येतील. त्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️
📢 लाडकी बहीण योजना पहिला हप्ता कधी आणि किती ? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिलेली माहिती :- येथे क्लिक करा
📢 ABP माझा यांनी हफ्ता कधी येणार याबद्दल दिलेली सविस्तर माहिती : येथे क्लिक करा
⤵️⤵️⤵️⤵️
